भिगवण : महान्यूज लाईव्ह
अल्पवयीन मुलीने एकतर्फी प्रेमास नकार दिला म्हणून मुलीची कपडे फाडून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार भिगवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला याप्रकरणी भिगवण पोलिसांनी तब्बल दहा जणांना विरोधात पोस्को व इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना 21 ऑगस्ट रोजी घडली. दरम्यान या घटनेत फक्त हा प्रकार करून हे नराधम थांबले नाहीत, तर मुलीच्या चुलतभावाला देखील बेदम मारहाण करून पोलिसात तक्रार दिली, तर ठार मारण्याची धमकी देत रिव्हॉल्वर दाखवला. त्यावरून भिगवन पोलिसांनी रोहन गायकवाड, अमित देवकाते, अतुल देवकाते, धीरज देवकाते, लहू देवकाते, ऋषिकेश गायकवाड, हर्षद धुमाळ, प्रणव कुंभार, गणेश गायकवाड,अनिकेत कुंभार (सर्व रा. मदनवाडी ता. इंदापूर जि. पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी या संदर्भात माहिती दिली असून आरोपींपैकी यांनी रोहन गायकवाड याला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती. यावेळी संशयित आरोपीने घरात घुसून तिला मी प्रेम करत असल्याचे व तू आम्हाला खूप आवडत असल्याचे सांगितले. त्यावर मुलीने प्रेमास नकार दिला, म्हणून दोन आरोपींनी तिचा विनयभंग करत तिचे कपडे फाडले व तू आम्हाला खूप आवडते असे म्हणत लज्जास्पद वर्तन केले व विनयभंग केला.
या घटनेनंतर गुन्हा दाखल झालेल्या दहा जणांनी सदर मुलीच्या चुलत भावास देखील मारहाण केली. लोखंडी रॉड डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले व शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. पोलिसांकडे जाशील, तर गोळ्या झाडून मारून टाकू अशी ही धमकी या आरोपीने दिल्याची फिर्याद चुलतभावाने पोलिसांकडे दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित पाटील करत आहेत.











