राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेचा दौंड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला .
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा केंद्र आणि राज्य सरकारने मोठा थाटामाटात उभा केला. मात्र तो पुतळा काही दिवसापूर्वी पडला गेला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. दौंड तालुक्यातील पाटस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते दिग्विजय जेधे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि २९) छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी जेधे म्हणाले, मालवणची घटना आपल्या अस्मिताला ठेच पोहचवणारी आहे, स्वाभिमान दुखावणारी आहे. महायुतीच्या भ्रष्ट कारभारामुळे आज बहुजनांच्या कुलदैवतांचा अपमान झाला आहे. हा इतिहासातील काळा दिवस आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या संदर्भात घडलेली महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. या घटनेची तसेच या पुतळ्याची सदोष आणि निकृष्ट दर्जाची निर्मिती करणारा कंत्राटदार जयदीप आपटे याची सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन पाटस पोलीसांना देण्यात आले. याप्रसंगी केतन वयभासे, ओमकार शिंदे, आदित्य पोळेकर, निलेश कथले, संदिप शितोळे, शरद साळुंके, यश जेधे, संदीप शिंदे, अक्षय दिवेकर, सचिन दिवेकर, राकेश शेळके, आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.











