• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यासाठी जाताय? तर या अनुभवाचीही तयारी ठेवा!

tdadmin by tdadmin
August 29, 2024
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामतीच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यासाठी जाताय? तर या अनुभवाचीही तयारी ठेवा!

बाळासाहेब थोपटे, बारामती

बारामती मेडिकल कॉलेज येथे बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील बाळासाहेब थोपटे यांना आलेला हा अनुभव आहे. हा अनुभव इतरांनाही आलेला आहे असे अनेक जण सांगत आहेत. इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी येथील रुग्णाला तर दोन महिन्याच्या पुढील तारीख सोनोग्राफीसाठी दिली होती. आता थोपटे यांनी लिहिलेला जो अनुभव आहे, तो वाचा आणि त्यानंतर या दवाखान्यातील उपचारासाठी येथील मस्तीखोर डॉक्टरांच्या समोर जाताना तो अनुभव लक्षात ठेवा आणि मानसिक तयारी करून मगच या दवाखान्यात उपचारासाठी जा! बाळासाहेब थोपटे यांनी त्यांना आलेला अनुभव लिहिला आहे. तो जसाच्या तसा..

दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी माझ्या भावाच्या पोटात दुखत असल्यामुळे बारामती मेडिकल कॉलेज येथे त्याला उपचारासाठी घेऊन गेलो, तेथे गेल्यानंतर केस पेपर काढण्यासाठी सांगण्यात आले. केस पेपर काढण्यासाठी एक तास लाईनमध्ये उभा राहून केस पेपर काढला. केस पेपर काढल्यानंतर केस पेपर नोंदवण्यासाठी 4 नंबरला जा असं आम्हाला सांगण्यात आलं.

मग तेथील डॉक्टरांनी केस पेपर नोंदवला, त्यानंतर आमचा एका तासाने नंबर आला. नंबर आल्यानंतर आम्हाला दुसऱ्या एका डॉक्टरकडे पाठवण्यात आले, तेथे पुन्हा लाईनमध्ये एक तास गेला, त्या डॉक्टरांनी पेशंटला चेक केले. तेथून त्या डॉक्टरांनी 13 नंबरच्या डॉक्टरांना भेटा असे आम्हाला सांगितले तेथून आम्ही 13 नंबरच्या डॉक्टरांकडे गेलो असता तेथे पुन्हा एक तास लाईनला लागून त्या डॉक्टरांकडे गेलो आम्ही आमच्या पेशंटचे आदल्या दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट 2024 ला रक्त, लघवी आणि सोनोग्राफी ही खाजगी मध्ये करून घेतली होती.

त्याचे रिपोर्ट त्या डॉक्टरांना दाखवले, परंतु तेथील डॉक्टर म्हणाले की, हे तुमचे खाजगी रिपोर्ट आमच्या येथे चालत नाहीत. तुम्हाला आमच्या इथलेच सोनोग्राफी आणि रक्ताचे रिपोर्ट घेऊन यावे लागतील आणि तपासणी करावी लागेल म्हणून त्यांनी आम्हाला रक्त आणि सोनोग्राफी करण्याची चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी घेऊन आम्ही रक्त तपासणीसाठी गेलो. तिथे पुन्हा एक तास लाईन मध्ये उभा राहिलो. एका तासाने आमचा नंबर आल्यानंतर तेथील स्टाफने आम्हाला सांगितलं की, या रक्ताच्या तपासण्या आमच्या इथे होत नाहीत.

त्यानंतर आम्ही सोनोग्राफी करण्यासाठी गेलो सोनोग्राफीसाठी देखील एक तास थांबलो. एक तासाने नंबर आल्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की तुम्हाला 30 सप्टेंबर 2024 म्हणजे एक महिन्यानंतरची सोनोग्राफीची तारीख देण्यात येत आहे. आत्ता आमची सहनशक्ती संपली होती. त्यांना आम्ही विनंती केली साहेब, आमचे पेशंटच्या पोटामध्ये दुखतंय. गेले 5 तास आम्ही पेशंटला घेऊन फिरतोय, त्याला असह्य वेदना होत आहेत. जवळपास महिनाभर पेशंट अशा अवस्थेत ठेवायचं तर हे कसं शक्य आहे?

त्यानंतर त्यांनी आम्हाला 30 ऑगस्ट 2024 म्हणजे 4 दिवसानंतरची तारीख दिली, यानंतर आम्ही पुन्हा ज्या डॉक्टरने आम्हाला रक्त आणि सोनोग्राफी करण्यास सांगितले, त्या डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की, डॉक्टर साहेब तुम्ही चिठ्ठी मध्ये रक्त तपासणीसाठी सांगितले, पण या तपासण्या तुमच्या इथे होतच नाहीत! तर मग संबंधित डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की, या तपासण्या तुम्ही बाहेरून करा. (ज्या की आम्ही अगोदरच केलेल्या आणि त्यांनी त्या नाकारल्या होत्या)

मग आम्ही डॉक्टरांना म्हणालो की, आम्ही कालच या टेस्ट बाहेरून केलेल्या आहेत. ज्या तुम्ही म्हणाला की, चालत नाहीत. मग या टेस्ट तुमच्याकडे होत नाहीत, तर आम्हाला आधीच तुम्ही याची कल्पना द्यायला हवी होती. तर संबंधित डॉक्टरांनी आमच्याशी असभ्य भाषा वापरली आणि आमच्याशी हुज्जत घालून, या तपासण्या इथे होत नाहीत ते आम्हाला तरी काय माहित अशी उत्तरे दिली.

त्यानंतर त्यांना आमच्याकडे असणाऱ्या खाजगी रिपोर्टवर उपचार करा असे म्हटले, तर ते डॉक्टर म्हणाले की, हे रिपोर्ट कालचे आहेत. आम्हाला आजचे रिपोर्ट लागतील. आम्ही म्हणालो ठीक आहे, आम्ही बाहेरुन नवीन तपासण्या करून येतो. पण तुम्ही किती वेळ आहात? तर त्यांनी आम्हाला सांगितलं की, आम्ही 1 वाजेपर्यंतच आहे आणि त्यावेळी 1 वाजल्यापण होत्या. आम्ही त्यांना म्हणालो, आत्ता तर एक वाजल्या, आम्ही आत्ता तपासण्या केल्या, तर या उदया चालतील का? तर ते डॉक्टर म्हणाले, तुम्ही बाहेर टेस्ट करा आणि उद्या बघू काय ते पुढचं.

आम्हाला प्रचंड चीड येत होती की, आधी जिथे खाजगी व कालचे रिपोर्ट चालत नव्हते, ते उद्या सर्व चालू लागले. आम्ही वाद नको म्हणून शांत राहिलो, त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 ऑगस्ट रोजी खाजगी रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी गेलो. तिथे गेल्यानंतर तेथील सर्व डॉक्टर वेगळेच होते. काल जे होते, त्यातील एकसुद्धा डॉक्टर तिथे नव्हते.

दुसऱ्या डॉक्टरांना आम्ही आमचा रिपोर्ट दाखवला. रिपोर्ट दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला काही गोळ्यांची चिठ्ठी लिहून दिली आणि त्यामधील काही गोळ्या त्यांच्या मेडिकलमध्ये मिळाल्या, तर काही आम्ही खाजगी मेडिकल मधून खरेदी करण्यासाठी गेलो, परंतु त्या चिठ्ठीवर गोळी किती पॉवरची आहे हेच लिहिलेले नव्हतं. मेडिकल वाले म्हणाले की, ही किती पॉवरची गोळी आहे? ते लिहिलं नाही. यावर ते लिहून आणा,

आम्ही पुन्हा त्या मॅडम व डॉक्टरांकडे आलो. त्यांना विचारलं की, ही तुम्ही जी गोळी दिली आहे, त्याची पॉवर किती आहे? हे तुम्ही लिहिलं नाही. मग त्यांनी एकमेकांकडे पाहून शेवटी मॅडम डॉक्टरांनी मोबाईलमध्ये सर्च केलं आणि मोबाईलवर पाहून आम्हाला त्या गोळीची पॉवर लिहून दिली. सदर गोळ्या आम्ही खरेदी केल्या.

त्यानंतर त्या गोळ्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी आलो, तर तेथील डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की, तुम्हाला ऑपरेशन करावे लागेल आणि आपल्या इथे ते होत नाही, तुम्हाला ससूनला जावं लागेल आणि ऑपरेशन करावे लागेल. आम्ही डॉक्टरांना म्हणालो की, डॉक्टर साहेब हा आजार इतका गंभीर आहे का? हा गोळ्या, औषधांच्या उपचारांवर बरा होणार नाही का? तर नाही तुम्हाला ऑपरेशनच करावे लागेल (ज्याची त्याला काहीच गरज नव्हती) आणि इथे ऑपरेशन होत नाही, तुम्हाला ससून ला जावे लागेल असं आम्हाला सांगण्यात आलं.

शासनाने लाखो रुपये खर्च करून लोकांना कमी खर्चात चांगले उपचार मिळावेत हा दृष्टीकोन असताना प्रत्यक्षात मात्र लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार इथे चालू आहे. तरी याकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज आहे. परंतू याकडे कोणाचेही लक्ष नाही ही शोकांतिका. (बाळासाहेब थोपटे : 7875585214)

Next Post
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवमान प्रकरण : दौंड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध!

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवमान प्रकरण : दौंड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group