मालवण : महान्यूज लाईव्ह
सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर आज ठाकरे आणि राणी गटामध्ये जोरदार राडा झाला. शिवसैनिक व नारायण राणे समर्थकांमध्ये यावेळी हाणामारी देखील झाली. आज महाविकास आघाडीचे राजकोट येथील किल्ल्यावर आंदोलन होते त्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळी मालवण मध्ये दाखल झाली होती. मात्र राणे गटानेही पाहणी करण्याच्या नावाखाली थेट समोरासमोर येऊन विरोध केला आणि वादाला सुरुवात झाली.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर ज्याप्रमाणे महाविकास आघाडीचे नेतेमंडळी आले होते. त्याचप्रमाणे निलेश राणे, नारायण राणे हे देखील आले होते. आम्ही इथले स्थानिक आहोत. बाहेरचे येऊन येथे पाहणी करणार असतील आणि पोलीस त्यांना संरक्षण देणार असतील, तर ते चालणार नाही. आम्ही गोळ्या घातल्या तर इथून हलणार नाही. असे आंडू पांडू आम्ही आयुष्यभर पाहिले, असा आक्रमक पवित्रा घेत नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यावर येण्यास विरोध केला.
दरम्यान 24 वर्षाच्या मुलाला पुतळ्याचं कॉन्टॅक्ट दिलं होतं. तो कुठे पळून गेला? त्याला पळून जायला भाजीपाल्यांनी मदत केली का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. दरम्यान ज्याप्रमाणे रेवण्णाला पळून जाण्यास मदत केली, त्याप्रमाणेच या पुतळ्याचे काम चुकीचे केलेल्या ठेकेदाराला देखील पळून जाण्यासाठी भाजपवाल्यांनी मदत केली असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. दुसरीकडे राणे यांनी केलेल्या विरोधाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, ज्यांची बाल बुध्दी जेवढी आणि उंची जेवढी, तेवढीच बुद्धी अशा शब्दात त्यांनी नारायण राणेंवर आणि निलेश राणेवर टीका केली.











