• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्जतमधील विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण, माता-भगिनींसाठी रक्षाबंधन सोहळा

tdadmin by tdadmin
August 24, 2024
in यशोगाथा, सामाजिक, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, व्यक्ती विशेष, Featured
0
कर्जतमधील विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण, माता-भगिनींसाठी रक्षाबंधन सोहळा

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन

कर्जत जामखेड ता. २४- आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून कर्जत-जामखेड मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच मतदारसंघातील माता-भगिनींसाठी ‘बंधन-नातं विश्वासाचं, सन्मानाचं’ या रक्षाबंधन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रसिद्ध गायक जुईली जोगळेकर आणि इंडियन आयडल फेम रोहित राऊत यांच्या मराठी व हिंदी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बारामती लोकसभेच्या खा.सुप्रिया सुळे आणि अहिल्यानगरचे खा.निलेश लंके उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथे रविवारी (२५ ऑगस्ट) सकाळी १० वाजता होणार आहे.

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत-जामखेडमध्ये गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांची विविध विकासकामे मंजूर करून करून ती पुर्ण करण्यात आली. यामधे कर्जतमधील व्यापारी संकूलसाठी ९ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला असून याठिकाणी ११६ गाळे बांधण्यात येत आहेत. कर्जतमध्ये विविध सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उभारणीचं काम हाती घेतले असून त्यासाठी ४.९९ कोटी रुपये इतका निधी मंजूर करून आणला आहे.

या इमारतीच्या माध्यमातून प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, कृषी विभाग, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय ही कार्यालय एका छताखाली येणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचण्यास मदत होईल शिवाय कामंही वेगाने मार्गी लागतील. कर्जत एसटी डेपो चे कामही पुर्ण झाले आहे आणि या डेपोमध्ये व्यापारी गाळे देखील काढण्यात येत असून ते गाळे मतदारसंघातील होतकरू तरुणांना व्यवसाय करण्यासाठी देण्यात येणार आहेत.

यासह संत सद्गुरु गोदड महाराज भक्त निवास (५ कोटी), कर्जत उपजिल्हा रुग्णालय (४४.८४ कोटी), शासकीय विश्रामगृह (४.३८ कोटी), कर्जत नगरपरिषद इमारत (५ कोटी), पोलीस वसाहत (७.१२ कोटी),महसूल कर्मचारी निवासस्थान (१३.८० कोटी) ही कामे देखील पूर्ण झाली असून याचेदेखील लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. नुकत्याच मागच्या आठवड्यात जामखेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात जामखेड नगरपरिषद, पंचायत समिती इमारत, नाना-नानी पार्क, सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक सभागृह अशा एकूण ८२ कोटी ५८ लाख रुपये खर्चाच्या कामाचे लाकार्पण करण्यात आले आहे.

यावेळी ३.८८ कोटी रुपये खर्चून पूर्ण केलेल्या कर्जत पंचायत समितीचा पहिला मजला, १ कोटी रुपये खर्चाचे स्व. जीवनराव उर्फ बापूसाहेब ढोकरीकर अत्याधुनिक अग्निशमन केंद्र या विकासकामांचे लोकार्पण आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी १९ कोटी रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधायुक्त निवास्थाने उभारण्यात येणार असून या कामाचं भूमिपूजनही यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी व पाटेगाव येथे होणाऱ्या रक्षाबंधन सोहळ्यासाठी मतदारसंघातील नागरिक, माता- भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार रोहित पवार मित्र मंडळ यांच्याकडून करण्यात येत आहे.

Next Post
राज्यभरातील महिला अत्याचाराच्या घटनेचा कर्जत-जामखेडकरांकडून तीव्र निषेध व्यक्त!

राज्यभरातील महिला अत्याचाराच्या घटनेचा कर्जत-जामखेडकरांकडून तीव्र निषेध व्यक्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group