राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
चारचाकी गाडी गरम झाल्याने रस्त्यावर उभा करून ती दुरुस्त करण्याचे काम सुरू असताना अचानक हायवा डंपर आला आणि त्याने तिघांना उडवले. त्यातील एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला ही घटना दौंड तालुक्यातील वाखारी येथे घडली.
याप्रकरणी पुण्यातील गंज पेठ येथील अमित धनंजय बोराटे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बोराटे हे त्यांचे मित्र सुरज मधुकर पेटाडे, रोहित प्रकाश पोकळे व विजय श्रीनिवास क्षीरसागर या तिघांसह पुण्याहून देवदर्शनासाठी सोलापूर कडे निघाले होते.
मित्र सुरज पेटाडे यांच्या स्विफ्ट कार ( एम. एच.१२-जे. ड-९००६) या कारमधून हे सगळे निघाले असता सुरज फेटाडे हे गाडी चालवत होते. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास स्विफ्ट कार वाखारी येथील पुणे सोलापूर महामार्गावर पोहोचले असता, गाडी अचानक गरम झाली. त्यामुळे गाडी थांबवून पेटाडे यांनी त्याचे बोनेट उघडले. चौघेही गाडीमध्ये काय झाले हे पाहत असतानाच समोरून अचानक एक हायवा डंपर अतिशय वेगाने आला.
हायवा डंपरचा चालक दारू पिलेला असल्याने तो पुणे सोलापूर महामार्गावरून थेट कारकडे येताना दिसला. त्यामुळे बोराटे यांनी बाजूला उडी मारली. परंतु हायवा गाडीची कारला व कार जवळ उभे असलेले रोहित प्रकाश पोकळे, विजय श्रीनिवास क्षीरसागर यांना जोरात धडक बसून कारचे समोर उभे असलेल्या सुरज पेटाडे यास कारसहीत फरफटत पुढे नेत हायवाने रस्त्यावर बाजूला उभे असलेल्या कन्टेनरला धडक दिली.
या धडकेने रोहित पोकळे यामध्ये गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी नेले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला तर इतर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत यावरून पोलिसांनी प्रदिप बाबासाहेब माने (वय ३८ वर्षे रा. वरवंड ता.दौंड जि.पुणे) त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.











