बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील पिंपळी येथील ऍग्रो पणन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये लेखापाल म्हणून काम करताना तब्बल सात लाख 66 हजार रुपयांचा गैरव्यवहार केला. याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील राजाराम साधू राऊत यांच्या विरोधात बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी शुभम दिलीप सूर्यवंशी यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून, ही घटना 20 नोव्हेंबर 2012 ते 11 जानेवारी 2019 दरम्यान वेळोवेळी लेखापाल म्हणून काम करताना घडली.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी, सन 2012 पासून सन 2021 पर्यंत राजाराम राऊत हे संबंधित सोसायटीमध्ये लेखापाल म्हणून काम करत असताना त्यांनी या सोसायटीच्या व्यवहारांमध्ये अधिकाराचा गैरवापर करून 7 लाख 66 हजार 392 रुपयांचा गैरव्यवहार केला. या घटनेचा पुढील तपास फौजदार जगदाळे करत आहेत.











