विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेपासूनच बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर शारदा प्रांगण या ठिकाणी एक कुटुंब एक झाड हा झाडे वाटपाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या (सोमवारी) वृंदावन लॉन्स या ठिकाणी बारा वाजता कार्यकर्ता मेळावा होणार असल्याची माहिती दिली.
जेवढे बूथ कमिटीचे मेंबर आहेत. महिला, युवक, युवती सगळ्या सेलची कार्यकारणी राष्ट्रवादीचे शहर व गावची कार्यकारिणी, आजी, माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर कारखाना, पी डी सी बँक, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी या सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी उद्या साधारण ज्या काही योजना असतील, याचे सविस्तर मार्गदर्शन त्या ठिकाणी करील. तरी त्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.











