सणसर गावातील सर्वेक्षणाचे परीणाम; १०९ संशयितांच्या तपासणीत तब्बल ३३ जण निघाले कोरोनाग्रस्त
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात भिगवण, निमगाव केतकी, अंथुर्णे, भरणेवाडी पाठोपाठ आज सणसर येथे रॅपीड अॅंटिजेनसाठी अॅक्टीव्ह सर्व्हे करण्यात आला. यामध्ये आजूबाजूच्या गावातूनही संशयितांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात आढळलेल्या १०९ संशयितांमध्ये तब्बल ३३ जण कोरोनाबाधित आढळले. आज इंदापूर तालुक्यात ६१ जण कोरोनाबाधित आढळून आले.
आज सणसर गावात ४५ पथकांमार्फत ११ हजार लोकसंख्येपर्यंतचे सर्वेक्षण करण्यात आले. आज दिवसभरात संपूर्ण गावाचे सर्वेक्षण पूर्ण झाले नाही. या सर्वेक्षणास जिल्हा परीषद सभापती प्रमोद काकडे यांनीही भेट दिली. या प्रशिक्षण व सर्वेमध्ये सहभागी झालेल्या सर्व शासकीय खात्यांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल गावडे, विस्तार अधिकारी किरण मोरे यांच्यासह गावचे पदाधिकारी उपस्थित होते.
सणसर येथे आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर येथील ६९ वर्षीय हॉटेल व्यावसायिक, भवानीनगर येथील ३५ वर्षीय पुरूष, १६ वर्षीय मुलगी, ३८ वर्षीय पुरूष, अशोकनगर येथील ४ वर्षीय मुलगी, ६० वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महिला, पवारवाडी येथील १३ वर्षीय मुलगा, तावशी येथील ६ वर्षीय मुलगी, ३५ वर्षीय महिला,२४ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
सणसरमधील सर्वेक्षण व कोरोनातपासणीचा व्हिडीओ येथे पहा किंवा महान्यूज फेसबुक पेजवरही पाहू शकता.
काझड येथील ४५ वर्षीय पुरूष, २९ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय पुरूष, २२ वर्षीय युवक, ३२ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय पुरूष,२३ वर्षीय युवकाचा यामध्ये समावेश आहे. हे सर्व मजूर आहेत.
याखेरीज अकोले येथील ८० वर्षीय पुरूष, ७२ वर्षीय महिला, २७ वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलगा, ९ वर्षीय मुलगा, १० वर्षीय मुलगी, ५ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
खासगी मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यांमध्ये काझड येथील ४४ वर्षीय पुरूष, कालठण नंबर १ येथील ३६ वर्षीय महिला, ३५ वर्षीय महिला, कसबा इंदापूर येथील ४५ वर्षीय महिला, शिवाजीनगर, बावडा येथील ५२ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय महिला, ६३ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
शासकीय तपासणीदरम्यान आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वालचंदनगर येथील ५० वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, निमदाव केतकी येथील २१ वर्षीय युवक, वरकुटे येथील ३२ वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, लासुर्णे येथील २२ वर्षीय युवक, भिगवण येथील ६० वर्षीय महिला, शेटफळहवेली येथील ५० वर्षीय पुरूष, लोणीदेवकर येथील ५५ वर्षीय पुरूष व २२ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
इंदापूरमधील रॅपीड अॅंटिजेन तपासणीत कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये निरा भिमा साखर कारखाना, शहाजीनगर येथील ३५ वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील ४४ वर्षीय पुरूष, वालचंदनगर येथील ३२ वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील २४ वर्षीय महिला व बेलवाडी येथील ३० वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
निरा भिमा बोगदाच कोरोनाबाधित?
आज सणसर येथे तपासलेल्या व कोरोनाबाधित आढळलेल्या काझड येथील रुग्णांमध्ये जवळपास सर्वच जण हे येथे सुरू असलेल्या निरा भीमा बोगद्यातील कामगार आहेत. एकाच दिवशी १२ जण कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. बोगद्याच्या ठिकाणी काम करणारे मजूर एकाच ठिकाणी राहत असल्याने तेथे सामूहिक संसर्गाचा धोका अधिक आहे. मात्र त्या धोक्याकडे ठेकेदारासह, शासकीय अधिकाऱ्यांचे व आरोग्य खात्याचेही गांभिर्याने लक्ष दिसत नाही. कारण यापूर्वीच तेथे कोरोनाग्रस्तांची तपासणी झाली होती. त्यानंतरही तेथे काळजी घेतली जात नसल्यानेच एकाच वेळी अनेक जण बाधित होत आहेत.











