महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज दुपारी पत्रकार परीषद घेऊन या पत्रकार परीषदेत आपल्याला आयकर खात्याची नोटीस आल्याचे सांगितले. आपल्यावर आयकर खात्याचे विशेष प्रेम असेल असे सांगत त्यांनी निवडणूकीपूर्वीच्या ईडीच्या नोटीशीची आठवण जागी केली. दरम्यान शरद पवार यांनी आज आपण संसदेतील अन्नत्याग केलेल्या सदस्यांसाठी अन्नत्याग केल्याचे सांगून आमचा कृषीच्या तीनही विरोधकांना विरोध असल्याचे स्पष्ट केले.
आज दुपारी १२ वाजता पवार यांनी पत्रकार परीषद घेऊन मराठा आरक्षण, संसदेतील कृषी विधेयकांबाबत त्यांनी भूमिका मांडली. पवार यांनी आयकर खात्याला महाविकास आघाडीतील नेत्यांवर विशेष प्रेम आहे. देशातील इतके सदस्य आहेत, त्यापैकी आमच्याबद्दल जी प्रेमाची भावना दिसत आहे, त्याचा आनंद आहे, नोटीस मला आधी आली असून आता सुप्रियाला देखील येणार आहे असे ते म्हणाले. आयकर खात्याने पवार यांना काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. सन २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान पवार यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर भूमिका मांडली. ते म्हणाले, आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट असून राज्यसभेच्या उपाध्यक्षांची जी भूमिका सभागृहात दिसली, ती सभागृहाचे अवमूल्यन करणारी होती, उपाध्यक्षांनी सदस्यांचं ऐकायला हवं होतं, पण तसं न करता, आवाजी पद्धतीनं मतदान घेतलं गेलं. त्यामुळे सदस्यांची नाराजी साहजिक आहे. सदस्यांनी संसदेच्या आवारात आंदोलन सुरू केलं आहे. मी नव्हतो ही गोष्ट खरी आहे, पण बाकीचे आमचे सहकारी सभागृहात उपस्थित होते. राज्यसभा सदस्यांनी अन्नत्याग केला. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. मीही आज दिवसभर अन्नत्याग केला आहे.










