दौलतराव पिसाळ, महान्यूज लाईव्ह
रात्रीचे साडेनऊ वाजले नाहीत तोच वाईतील विष्णू मंदिराचा परिसर हादरून गेला या मंदिराच्या परिसरातील सुवर्णकारांची दुकाने पिस्तूल व कोयत्याच्या धाकाने लुटली. या दुकानांमधून लाखोंचा माल चोरीला गेल्याची शक्यता आहे.
वाईतील विष्णू मंदिर येथील सोन्या चांदीच्या दुकानदारांनी दिलेले सोने गाळून तिची लगड करुन देणाऱ्या व्यावसायिकांची दोन दुकाने आहेत. या दुकानात रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती हातात कोयता आणी पिस्तूल घेऊन घुसले व त्यांनी हत्यारांचा धाक दाखवत सोने चांदी लुटून नेले.
याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांना समजताच ते पोलिस अधिकारी व पोलिसांचा ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. या पोलिस पथकाने वाई शहरातील सर्व सीसीटिव्ही कॅमेरे तपासले.
आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आले असून या दरोड्याचा तपास जलद गतीने करण्या साठी श्वानपथक व ठसेतज्ञांची मदत घेतली जात आहे. या पोलिसांच्या जोडीला साताऱ्याची स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही तपासात असून घडलेल्या घटनेने मात्र वाई शहरात मोठी दहशत पसरले आहे.











