महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल आहे. अभिनेत्री सारा अली खान आणि श्रध्दा कपुर या प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे आल्याने तपासाला एक वेगळच वळण मिळण्याची शक्यता आहे.
एनसीबीकडून सुरू असणाऱ्या या प्रकरणातील तपासात अनेक नाव समोर येत आहेत. दरम्यान या प्रकरणी आता दोन दिग्गज अभिनेत्रींची नाव समोर आल्याने संपूर्ण बॉलीवूड आणि त्यांचे चाहते हादरले आहेत.
अभिनेत्री सारा अली खान आणि श्रध्दा कपुर या प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे आल्याने तपासाला एक वेगळच वळण मिळण्याची शक्यता आहे. एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सारा अली खान आणि श्रध्दा कपुर यांची नावे प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करताना समोर आली आहेत.
त्यामुळे एनसीबीकडून प्रश्नोत्तरासाठी सारा आणि श्रध्दाला बोलवण्यात येण्याची शक्यता आहे. एनसीबीकडून आज किंवा उद्या सारा व श्रध्दा ची चौकशी केली जाईल.अशी माहिती एनसीबीच्या टॉपच्या सूत्रांकडून मिळाली आहे.










