पुणे : महान्यूज लाईव्ह
एक दिवस तरी वारी अनुभवावी हा अभिनव उपक्रम राबवणारे प्रबोधनकार कीर्तनकार शामसुंदर सोन्नर महाराज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना भेटून वारी चालण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिल्यानंतर शरद पवार यावर्षी वारीत चालणार अशा स्वरूपाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.
मात्र काल शरद पवार यांनी या बातम्यांचे खंडन केले. माझ्या गावावरून ही वारी जाते. त्यामुळे मी एक दिवस थांबून या ठिकाणी स्वागत करणार आहे, मात्र मी पालखीत सोहळ्यात पायी चालणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. संत तुकोबारायांचा पालखी सोहळा बारामती वरूनच पंढरपूर कडे जातो. साहजिकच यावर्षी एक दिवस आपण थांबणार असून, पालखीच्या स्वागतासाठी थांबणार आहे, मात्र पालखीसोबत चालणार नाही असे शरद पवार यांनी सांगितले.











