• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निंबूत गोळीबार प्रकरण : रणजीत निंबाळकरांच्या खून प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी गौतम काकडेला पोलिसांनी केली अटक! 

tdadmin by tdadmin
June 30, 2024
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
निंबूत गोळीबार प्रकरण : रणजीत निंबाळकरांच्या खून प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी गौतम काकडेला पोलिसांनी केली अटक! 

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह 

गुरुवारी मध्यरात्री 11 च्या सुमारास गोळीबार झाला. गोळीबारानंतर फरार झालेला मुख्य आरोपी गौतम काकडे आज पोलिसांनी शिताफीने पकडला. गौतम काकडेला अटक करण्यात आली असून, या प्रकरणात आपर्यंत गौतम काकडे सह गौतम काकडे चा भाऊ गौरव काकडे व वडील शहाजी काकडे या तिघा जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. 

निंबूत येथील गोळीबारात जखमी झालेल्या फलटणच्या रणजीत निंबाळकरांची जगण्याची लढाई काल पहाटे अडीच वाजता संपली. त्यानंतर रणजीत निंबाळकरांचे चाहते, त्यांचे नातेवाईक व निकटवर्तीय यांनी आज सकाळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे गाठले. याच पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे, मात्र गौतम काकडेला अजून अटक करण्यात आलेली नसल्याने गौतम काकडेला अटक करा, आमचा बैल आमच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्ही गौतम काकडे च्या घरासमोरून हलणार नाही असा इरादा व्यक्त करत गर्दी वाढू लागल्याने तणाव निर्माण झाला होता. 

त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके, त्याचबरोबर बारामती पोलिसांची पथके,वडगाव निंबाळकर पोलिसांची पथके गौतम काकडेच्या मागावर होती. गौतम काकडे कोठे आहे. या संदर्भात तपास युद्धपातळीवर सुरू होता. आज रात्री उशिरा गौतम काकडेला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली.

गुरुवारी मध्यरात्री 11:00 वाजल्यानंतर ते आज पहाटेपर्यंत बारामती तालुक्यात मोठी खळबळजनक घटना घडली. बैल आणि बैलगाडा शर्यतीच्या दुनियेत महत्त्वाचं नाव असलेल्या ट्रिपल महाराष्ट्र हिंदकेसरी गौतम काकडे याच्या घरी बैलाच्या व्यवहारावरून गोळीबार झाला, या गोळीबारात जखमी झालेल्या रणजीत निंबाळकर यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान त्यांचा पहाटे मृत्यू झाला.

बैलाच्या व्यवहारावरून वाद होऊन गोळीबार होण्याची व त्यात एखाद्याचा जीव जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याने राज्यभरातील बैलगाडा शर्यत प्रेमीना मोठा धक्का बसला. 

 बैलगाडा शर्यत रक्तरंजित होण्याची तशी ही पहिलीच गंभीर घटना होती. त्यामुळे राज्यभरात या घटनेची चर्चा झाली. गोळीबाराची घटना घडल्यापासून बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये गौतम काकडे याच्याबद्दल संतापाची लाट होती. 

गौतम काकडे यांच्या व्यवहाराबद्दल अनेक जण बोलू लागले होते. काल पहाटे रणजीत निंबाळकर यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच या संतापाचा कडेलोट झाला. अनेक जण मिळेल त्या वाहनाने वडगाव निंबाळकर ला पोहोचत होते. त्यांनी वडगाव निंबाळकर ला येऊन आमचा सुंदर बैल आमच्या ताब्यात द्या व गौतम काकडेला अटक करा अशी मागणी केली. 

दरम्यान या घटनेत पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गौरव काकडे यास अटक केली आहे, तर सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण गुन्ह्यांमध्ये सहा जणांचा समावेश झाला होता. घटना घडल्यापासून गौतम काकडे हा फरारी होता. मात्र पोलिसांनी आज त्याला अटक केली आहे. आता या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज तसेच रिव्हॉल्व्हर आणि त्याविषयीची अन्य माहिती पोलीस तपासात निष्पन्न होईल.

गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास गौतम शहाजी काकडे याच्या घरी निंबूत येथे बैलाच्या पैशाच्या व्यवहारावरून गौतम काकडे याचा भाऊ गौरव याने फलटण येथील सुंदर बैलाचा मालक रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली. गोळी डोक्यात गेल्याने निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सुरुवातीला बारामती येथे व त्यानंतर पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या संदर्भात अंकिता रणजीत निंबाळकर (रा. स्वामी विवेकानंद नगर फलटण) यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे व तीन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र या घटनेतील जखमी निंबाळकरांचे निधन झाल्याने हा खुनाचा गुन्हा म्हणून रूपांतरीत झाला. 

Next Post
निसर्ग चुकीला माफ करत नाही.. भुशी धरणाच्या पाठीमागच्या धबधब्यात पाच जण वाहून गेले! तीन जणांचा मृतदेह सापडला!

निसर्ग चुकीला माफ करत नाही.. भुशी धरणाच्या पाठीमागच्या धबधब्यात पाच जण वाहून गेले! तीन जणांचा मृतदेह सापडला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group