सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
पश्चिम मालाड मधील आईस्क्रीम मध्ये सापडलेलं मानवी बोट इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसीतील फॉर्च्यून डेअरी मधील असल्याचे स्पष्ट झाले होते. या कंपनीतील ओंकार पोटे या कर्मचाऱ्याचे बोट तुटल्याचे पोलिसांनी शोधून काढले होते, पण रक्ताचा अहवाल जुळला नाही म्हणून डीएनए अहवालाची प्रतीक्षा होती मात्र डी एन ए अहवालात ते तुटलेले बोट ओंकार पोटेचेच असल्याचे आता उघड झाले आहे.
मुंबईच्या पश्चिम मालाड मधील एका डॉक्टरच्या कुटुंबाने मागवलेले आईस्क्रीम चांगलेच वादात सापडले. या एका घटनेने या यम्मो कंपनीची विश्वासार्हता संपुष्टात आली, पण त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे बोट पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसीतील फॉर्च्यून डेअरी मधील असल्याने याही कंपनीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला.
मुंबई व पुणे पोलिसांनी केलेल्या तपासातून अखेर हे बोट कोणाचे हे उघड झाले. ऑनलाइन आईस्क्रीम विकणाऱ्या कंपनीचे आईस्क्रीम गाझियाबाद येथील लक्ष्मी डेअरी व इंदापूर येथील फॉर्च्यून डेअरी मध्ये तयार होते, त्यामुळे या दोन्ही कंपन्यांवर पलिसांची नजर होती. सुरुवातीला पोलिसांनी यम्मो कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता, मात्र तपासादरम्यान हे मानवी बोट इंदापूर येथील फॉर्च्यून डेअरी मधील कर्मचाऱ्याचे होते हे पोलिसांनी शोधून काढले.
या कंपनीतील ओंकार या कर्मचाऱ्याचे हे बोट असल्याचे पोलिसांनी शोधून काढले होते. हा फॉर्च्यून डेअरीमध्ये असिस्टंट पॅकिंग मॅनेजर म्हणून एप्रिल 2024 पासून कामावर होता. मात्र 11 मे 2024 च्या दिवशी सकाळच्या वेळी आईस्क्रीमची पॅकिंग करत असताना त्याच्या बोटाचा वरचा भाग तुटला. त्याच्यावर उपचार देखील करण्यात आले, मात्र ते बोट कुठे गेले हे शोधले गेले नसल्याचा पोलिसांचा संशय होता.
दरम्यान हे बोट कोणाचे आहे हे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कर्मचाऱ्याची रक्ताची चाचणी केली. मात्र आईस्क्रीम मध्ये सापडलेल्या बोटात रक्त नसल्याने, या रक्ताचे सॅम्पल त्या बोटाशी जुळलेले नाही. त्यामुळे त्याची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या डीएनए तपासणीचा अहवाल आला असून आता मात्र हे बोट निश्चित त्याचेच होते हे सिद्ध झाले आहे. आता कंपनी व कर्मचाऱ्याविरोधात अन्न आणि भेसळ प्रतिबंधक खाते तसेच पोलीस खाते काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष











