• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधानाच्या कन्येचा साधेपणा!

tdadmin by tdadmin
June 19, 2024
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राजकीय, ताज्या बातम्या, प्रवास, व्यक्ती विशेष, Featured
0
पंतप्रधानाच्या कन्येचा साधेपणा!

डॉ. श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक 

भारतीय इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात विशेषत: प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास संशोधन आणि लेखनाच्या क्षेत्रात इतिहासकार डॉ. उपिंदर सिंग यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचे लेखन प्रचारकी नव्हे, तर अकॅडमिक पातळीवरचे अर्थात उच्च दर्जाचे आहे. “The history of ancient and early mediaeval India” हे त्यांचे अत्यंत गाजलेले पुस्तक आहे. 

त्यांची सर्वच पुस्तके ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना पुण्यातील नामवंत अशा सरहद्द संस्थेने संत नामदेव पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. उपिंदर सिंग या भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कन्या आहेत. परंतु पंतप्रधानाच्या कन्या असल्याचा त्यांना कोणताही अहंकार नाही, बडेजाव नाही, घमेंड नाही.  

उपिंदर सिंग यांचे राहणीमान अत्यंत साधे, सरळ आहे. व्यक्तिमत्व अत्यंत सौजन्यशील आणि विनयशील आहे. त्या कार्यक्रमासाठी आल्या, सर्वांशी अत्यंत नम्रतेने  बोलत होत्या. कार्यक्रम संपल्यानंतरदेखील त्यांनी प्रत्येकाशी चर्चा केली. त्यांनी अनेकांच्या प्रश्नाला सविस्तर, अभ्यासपूर्ण आणि नम्रतापूर्वक अशी उत्तरे दिली. त्यांच्यासोबत त्यांचे पती डॉ. विजय तनखा हेदेखील उपस्थित होते. त्यांनी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केलेली आहे. दोघांनीही संशोधन-लेखनाच्या क्षेत्रासाठी सर्व आयुष्य समर्पित केलेले आहे.

डॉ. उपिंदर सिंग यांनी आयुष्यभर निष्ठेने प्राध्यापक म्हणून काम केले, आज त्या अशोका विद्यापीठाच्या डीन आहेत, परंतु संशोधनाचे काम त्यांनी अविरतपणे चालू ठेवलेले आहे. मी त्यांना भेटून माझ्याजवळ असणाऱ्या त्यांच्या ग्रंथावरती त्यांची सही घेतली. त्यावेळेस त्यांनी याची नवीन आवृत्ती नक्की वाचा असे आवर्जून सांगितले. मी शिवचरित्रावरती पीएच.डी. केल्याचे संयोजक संजय नहार यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने खूप दर्जेदार चर्चा केली.

डॉ. उपिंदर सिंग या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कन्या असल्यामुळे त्यांना कुलगुरू होणे किंवा राज्यसभेवर खासदार होणे कठीण नव्हते, आजही नाही, पण तरीदेखील कोणतीही अभिलाषा किंवा मोह न ठेवता अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने त्यांनी काम केलेले आहे. या हपापलेल्या, लुटारू आणि हावरट जगामध्ये आजही डॉ. उपिंदर सिंग यांच्यासारख्या व्रतस्थ व्यक्ती आहेत हे पाहून आनंद वाटतो. मला सर्वात त्यांचा आवडलेला गुण म्हणजे त्यांची कमालीची विद्वत्ता आणि विनयशीलता! विद्या विनयेन शोभते, हे त्यांनी दाखवून दिले. आहो; आजकाल साध्या आमदाराची अपवाद वगळता मुलेदेखील  नीट बोलत नाहीत आणि जमिनीवर नीट चालत नाहीत. हवेतच असतात. इतरांना तुच्छ लेखणे, बोलणे आणि प्रचंड माज दाखवणे अशी वृत्ती असते.  

डॉ. उपिंदर सिंग या पंतप्रधानाच्या कन्या, परंतु त्यांच्याकडे कोणत्याही स्वरूपाचा बडेजाव किंवा घमेंड नाही. समाजाला सुसंस्कारित करण्यासाठी नेहमी आदर्शाची गरज असते, मग ते इतिहासातील आणि वर्तमानातील आदर्श असू शकतात. डॉ. उपिंदर सिंग या वर्तमानातील आदर्श आहेत. संत तुकाराम महाराज म्हणाले होते, “शुद्ध बीजापोटी l फळे रसाळ गोमटी” डॉ. मनमोहन सिंग हेच अत्यंत सुसंस्कृत राजनेते आहेत, त्यामुळे ते संस्कार त्यांच्या कन्येने ज्ञानाच्या क्षेत्रात  संवर्धित केलेले आहेत.

Next Post
शाळा आहेत का लुटीचा कारखाना? दौंडमधील काही खाजगी शाळा आकारतात मनमानी पद्धतीने प्रवेश फी! गणवेश आणि बुटाचीही केली जातेय सक्ती!

शाळा आहेत का लुटीचा कारखाना? दौंडमधील काही खाजगी शाळा आकारतात मनमानी पद्धतीने प्रवेश फी! गणवेश आणि बुटाचीही केली जातेय सक्ती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group