इंदापूर : महान्यूज लाईव्ह
उजनी धरणाच्या पात्रात आज संध्याकाळच्या वेळी वाहतूक करणारी एक लॉन्च उलटल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या घटनेत काहीजण बुडाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे दरम्यान विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चार जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत असून एक जनाचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
इंदापूर तालुक्यातील कळाशी गावच्या हद्दीत उजनी पात्रात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, अद्याप यास दुसरा मिळालेला नाही. मात्र भूगाव ते काळाशी अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लॉन्च च्या बाबतीत हा अपघात झाल्याची माहिती सांगितली जात आहे. शासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी महसूल विभागाचे व पोलीस दलाचे कर्मचारी पोहोचत आहेत.
सध्या पूर्वमसमी वारे वाहत असून अवकाळी पाऊस हि हजेरी लावत आहे. अशा परिस्थितीत वादळी वाऱ्याचा प्रादुर्भाव ही सगळीकडे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन-तीन दिवसात अत्यंत वेगाने वाहणारे वारे अनेकांनी अनुभवले. अशा परिस्थितीत पाण्याच्या पात्रातही याचे परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन पर्यटकांच्या बोटी पूर्व मोसमी पावसाच्या काळात पाण्यात सोडू नयेत अशीच परिस्थिती या निमित्ताने निर्माण झाली आहे.
सविस्तर माहिती बातमी अपडेट करून थोड्याच वेळात मिळेल.











