काका यादव, भवानीनगर
सणसर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ. राणी जयराम गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्रीमती अरुणा रवींद्र खवळे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. खवळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली.
उपसरपंच पदासाठी सदस्यांनी राणी गायकवाड यांचे नाव एकमताने सुचवले. निर्धारित वेळेत राणी गायकवाड यांचाच एकमेव अर्ज झाल्याने त्यांची ग्रामपंचायत सणसरच्या उपसरपंच पदी निवड करण्यात आली. सरपंच पार्थ निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
ग्रामसेवक सचिन पवार, तसेच छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजीत निंबाळकर, माजी सरपंच विजय निंबाळकर, माजी संचालक संजय निंबाळकर, अमोल भोईटे, विजयसिंह निंबाळकर, विजय गायकवाड, सचिन गायकवाड, विजय यादव, नेताजी गायकवाड, गणेश गवळी आदी उपस्थित होते. निवडीनंतर राणी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.