• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुप्रिया सुळे यांना शेती कशी आहे हे माहिती आहे का? पाण्याचं काय कळतय! तिला निवडून मीच आणलंय!

tdadmin by tdadmin
May 5, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
सुप्रिया सुळे यांना शेती कशी आहे हे माहिती आहे का? पाण्याचं काय कळतय! तिला निवडून मीच आणलंय!

अजित पवारांची वरवंड च्या सांगता सभेत सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह

दौंड : बारामतीच्या खासदारांना तीन वेळा मीच निवडून आणले आहे. मात्र बारामती मतदारसंघाचा विकास त्यांनी केला नाही. बारामती मतदारसंघाचा राज्यातून निधी आणुन मीच विकास केला आहे. तिला शेतीचे काय कळतंय? कधी शेती बघितली आहे का ? धरणात किती पाणी असते हे माहिती आहे का? अशी बोचरी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता वरवंडच्या सांगता सभेत केली. सुळे यांच्यावर टिका करताना मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे तोंड भरून कौतुक केले.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा रविवारी (दि ५) दौंड तालुक्यातील वरवंड येथे पार पडली. या सभेत बोलताना पवार यांनी विरोधकांवर टीका करत अनेक खुलासे केले. दरम्यान, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची या सभेत उपस्थिती नसल्याने हा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.

यावेळी उपस्थितांना त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सत्तेसाठी आणि पदासाठी महायुतीत गेलो नाही, मला उपमुख्यमंत्री पदाच्या लोभासाठी ही गेलो नाही. बारामती मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. शेवटच्या घटकांना न्याय द्यायचा आहे. लोकांची विकास कामे करायची आहेत या लोभासाठी मी महायुतीत गेलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगली कामे केली आहेत.

शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीला चांगला बाजारभाव दिला आहे. काँग्रेस सरकारने दखल न घेतल्याने इन्कम टॅक्समुळे पंचवीस हजार कोटींचा भुर्दंड बसला आहे.‌ पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी आम्हाला केंद्राचा निधी देण्याचा आणि विकास कामे करण्याचे आश्वासन दिले आहे. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर गोरगरिबांना तीन कोटी गरीब बांधणार आहेत. असे माहिती पवार यांनी यावेळी बोलताना दिली.

पुढे ते म्हणाले की, आताच्या खासदारांनी तीन वेळा निवडून येऊनही काही केले नाही. ते सोन्याच्या चमच्या तोंडात घेऊन जन्माला आले आहेत. मी पाणी अडवणार अशी टीका करतेत, पण मी कशाला पाणी आडवु? त्यांना पाणी कुठे असते, ते माहित आहे का ? कधी शेती बघितली आहे का? त्या लहान होत्या, तेव्हा ज्वारीला मका, तर गहु आहे की तांदूळ आहे हे सांगता येत नव्हते. मला भावकीबाबत काहीच बोलायचं नाही. महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या. दौंड तालुका सुजलाम सुफलाम करतो. बारामती नंतर दौंड विकास कामांत एक नंबरवर असेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दौंड करांनी दिले..

महेश भागवत बाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट!

या सभेत अजित पवारांनी दौंडच्या उमेदवाराला मते देऊन आपली मते वाया घालवू नका, ते काय निवडून येऊ शकत नाहीत. त्यांच्याशी चर्चा केली, पण त्यांची अपेक्षा मोठी होती. त्यांना डायरेक्टर करू, बँकेचे चेअरमन करतो, महामंडळ देतो, उमेदवारी अर्ज माघारी घ्या म्हणालो, पण त्याची लयच मोठी अपेक्षा होती असा गौप्यस्फोट पवार यांनी हात जोडून ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत यांचे नाव न घेता या सभेत बोलताना केला.

याप्रसंगी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुल, दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, नागसेन धेंडे, जितेंद्र बडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना दौंड आरपीआयचा घरचा आहेर! महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांना दिला बिनशर्त जाहीर पाठिंबा!

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना दौंड आरपीआयचा घरचा आहेर! महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांना दिला बिनशर्त जाहीर पाठिंबा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group