शिरूर : महान्यूज लाईव्ह
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांची नुकतीच सहायक पोलिस निरीक्षक या पदावर पदोन्नती झाली.
गणेश जगदाळे यांनी पोलीस दलात काम करताना प्रथम नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यात झाल्यानंतर तीन वर्षे उत्कृष्ट सेवा केली. नक्षलवाद बीमोड करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर शिरूर पोलीस स्टेशन येथे बदली झाल्यानंतर अनेक नामचीन गुंडांना वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न केले. अवैध धंद्यांवर कारवाया केल्या.
त्यांच्या याच कामगिरीची दखल घेत पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेत त्यांची वर्णी लागली. स्थानिक गुन्हे शाखेत काम करत असताना शिरूर तालुक्यातील एटीएम चोरीचा तपास, शिरूर, दौंड, बारामती आदी तालुक्यातील गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांना यश आले, तर अनेक दरोडे व गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण ते मुंबई येथे गणेश जगदाळे यांची सहायक पोलिस निरीक्षक या पदावर पदोन्नती झाली असून शिरूर शहरातून अभिनंदन केले जात आहे.











