सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
उणेपुरे अवघे नऊ वर्षे वय…बाहुली बरोबर खेळण्याच्या वयात तीन चक्क संशोधन पेपर सादर केला. रोल ऑफ पेरेंट्स इन चाइल्ड्स प्रायमरी एज्युकेशन म्हणजेच लहान मुलांच्या प्राथमिक शिक्षणात पालकांचा सहभाग या विषयावर तिने सादर केलेल्या या प्रबंधाची चक्क इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली. ही नऊ वर्षाची श्रीनिधी सागर घोळवे पुण्यातील सरहद या शिक्षण संस्थेमधील विद्यार्थिनी असून ती मूळची इंदापूर तालुक्यातील निंबोडी गावची आहे.
इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील मूळचे रहिवासी सागर घोळवे यांची श्रीनिधी सोनाली सागर घोळवे ही मुलगी असून ती सरहद स्कूलमध्ये तिसरीत शिकते. सागर घोळवे हे वकील, तर सोनाली घोळवे या प्राध्यापिका आहेत. आई वडील सतत संशोधन करतात, म्हणजे नेमकं काय करतात? हे पाहत श्रीनिधीने देखील आईच्या पीएचडी सारखाच प्रबंध तयार करायचा खटाटोप सुरू केला.
आई ज्याप्रमाणे माहिती गोळा करते, त्याप्रमाणे तिने देखील सुरुवात केली आणि हळूहळू मुलांच्या प्राथमिक शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग कसा असतो, किती असतो यावर तिने मुद्दे नोंदवायला सुरुवात केली. एक मार्च 2024 च्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऍडव्हान्स रिचार्ज इन सायन्स या जर्नलच्या चौथ्या आवृत्ती मध्ये तिचा प्रबंध देखील सादर झाला प्रसिद्ध झाला प्राथमिक शिक्षणावर शोधनिबंध लिहिणारी श्रीनिधी ही पहिलीच लहान मुलगी ठरली असल्याचे देखील यातून निष्पन्न झाले.











