ठाणे : महान्यूज लाईव्ह
अवघ्या दीड वर्षाच्या मुलीच्या डोक्यावर धारदार शास्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले व ती आजारी असल्याचे इतरांना भासवत तिच्यावर जुजबी उपचार सुरू केले. तिचा मृत्यू होताच तिला दफनही केले, पण पोलिसांनी जेव्हा शोधले, तेव्हा चार मुलींनंतर पाचवी मुलगी झाली, म्हणून मुलीचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
ठाण्यातील मुंब्रा भागात ही घटना घडली असून निव्वळ माणुसकीलाच काळीमा नाही, तर अजूनही आपण कोणत्या युगात जगतो आहोत, याचा गंभीर विचार करायला लावणारी ही घटना आहे. कळवा पोलिसांनी जाहिद शेख व त्याची पत्नी नुराणी या दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी आपल्या दीड वर्षीय लबिबा या मुलीची केवळ चार मुलांनंतर पाचवी ही मुलगी झाली तिचा संभाळ कसा करायचा म्हणून खून केल्याचे त्यांनी कबूल केले.
दीड वर्षीय लबिबा हिला आजार झाल्याचा बहाणा करत तिच्यावर उपचार सुरू असतानाच 18 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला होता. कोणालाही न कळवता परस्पर तिचा मृतदेह 19 मार्च रोजी मुंब्रा कब्रस्तानमध्ये या दांपत्याने दफन केला होता. मात्र त्याची माहिती पोलिसांना संतोष महादेव नावाच्या व्यक्तीने 4 एप्रिल रोजी मुंब्रा पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांची चक्रे वेगाने फिरली.
विशेष म्हणजे जेव्हा या दांपत्याला ताब्यात घेतले, तेव्हा त्यांनी पहिल्या मुलीचाही खून करण्याचा प्रयत्न केला होता अशी कबुली दिली आहे, अशी माहिती कळव्याचे सहायक पोलिस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी दिली.











