राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार या पक्षाकडून शरद पवारांनी भिवंडीसाठी सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची निवड केली. त्यांना उमेदवारी जाहीर केली आणि उमेदवारी जाहीर करताच 24 तासाच्या आत बाळ्यामामांवर एमएमआरडीए कडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील येवई येथील आर के लॉजिक पार्क यातील गोदाम बांधकामावर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीए ने नोटीस बजावली आहे. राजकीय दबावातून ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. मात्र बाळ्यामामांच्या अडचणी वाढल्याचे यातून सिद्ध होत आहे.
दरम्यान यासंदर्भात बाळ्या म्हात्रे यांनी कपिल पाटलांवर निशाणा साधला आहे. ज्यांचे घर काचेचे असते ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू शकत नाहीत, पाठीमागून वार करण्यापेक्षा समोरून लढा असा आव्हान बाळ्या मामा म्हात्रे यांनी कपिल पाटील यांना दिले आहे.
दरम्यान बाळ्यामामा म्हात्रे यांनी या संदर्भात सांगितले की, मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून तब्बल 90 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्टाचाराची जननी हे कपिल पाटील हेच आहेत. तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यक्ष काढले आहेत, त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षण करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असून उच्च न्यायालयातून स्थगिती आदेशही घेतला आहे असं स्पष्टीकरण बाळा मामा म्हात्रे यांनी दिले आहे.











