दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालु्क्यात खासगी रूग्णालयात कोरोना रूग्णांकडून वाढीव बील आकारून आर्थिक लुट केल्यावरून राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे यांनी संबंधित रूग्णालयात रूद्रावतार धारण केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. या प्रकाराची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी चौकशी चे आदेश दिले आहेत.
संबंधित रूग्णालयाची चौकशी करण्यासाठी अधिका-यांची नियुक्ती केली आहे.संबंधित रूग्णालयाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश
तहसीलदार संजय पाटील यांनी दिले आहेत.
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज फेसबुक पेज वर पाहू शकता
दौंड शहर व तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग व झपाट्याने वाढत चालेले कोरोनाग्रस्त रूग्ण यांची संख्या लक्षात घेवून त्यांना तातडीने उपचार मिळावे यासाठी शहरातील तीन व तालुक्यातील एक असे चार खासगी रूग्णालये अधिकृत करून कोवीड सेंटर घोषीत केले होते. मात्र काही खासगी कोवीड रूग्णालये कोरोना रूग्णांना उपचारासाठी दाखल करून घेत नाहीत. त्यांची हेळसांड करीत आहेत. त्यांची आर्थिक लुट करीत आहेत. मनमानी कारभार करीत रूग्णांची फसवणुक करीत आहेत. अशा तक्रारी काही दिवसापुर्वी दौंड शहरातील कोवीड सेंटरची आल्याने संबंधित रूग्णालयावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा प्रकार ताजा असतानाच प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या केडगाव येथील मुयरेश्वर रूग्णालयाकडून वाढीव बील आकारून लुट झाल्याची तक्रार काही रूग्णांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या आहेत.
ती तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे यांच्याकडे आल्याने वैशाली नागवडे यांनी गुरूवारी ( ता.17 ) शासकीय अधिकाऱ्यांना घेवून थेट संबंधित रूग्णालय गाठले, मात्र काही अधिकारी रूग्णालयाची बाजू घेत असून दिशाभूल करीत असल्याने वैशाली नागवडे चांगल्याच संतापल्या.
त्यांनी संबंधित अधिकारी व रुग्णालयाची चांगलीच खरडपट्टी काढली. यांच्यावर कारवाई करावी यासाठी रूग्णालयात ठिय्याच मांडला.
या प्रकरानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. या प्रकाराची त्वरीत दखल दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी घेतली आहे. केडगाव येथील मयुरेश्वर रूग्णालायत रूग्णांकडून बाढीव बिलाची तक्रार प्राप्त झाल्याने चौकशी करण्यासाठी सात अधिकारांची नेमणुक केली आहे. संबंधित रूग्णालय कोवीड सेंटर म्हणून घोषीत केल्यापासून ते आतापर्यंत कोरोना उपचारासाठी रूग्णांची यादी घेणे, सदर रूग्ण कोरोना पॅाझिटिव्ह असलेले लॅंब तपासणी शासकीय किंवा खासगी लॅँब आहे का याची तपासणी करणार आहे.
रूग्णलयात दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज पर्यंत कोरोना बाबत काय उपचार केले, रूग्णांना आकारण्यात आलेल्या बिलांची माहिती गोळा करणे आदींसह कोरोना रूग्णांविषयीची या रूग्णलायतील सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल सादर कण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला आहे.
यवत ग्रामिण उपजिल्हा रूग्णालायचे वैद्यकीय अधिक्षक डॅा.शशिकांत इरवाडकर यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नेमणुक केली आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली सदर रूग्णालयाचे कामकाज करण्यात येणार आहे.
दरम्यान, रूग्णालयात दाखल झालेल्या संशयित कोरोना रूग्णांचा तपासणी अहवाल हा निगेटिव्ह असताना तो पॅाझिटिव्ह करून उपचाराच्या नावाखाली लाखो रूपयांची बील आकारली.शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य निधीतून संबंधित रूग्णांना लाभ ही संबंधित रूग्णालयाकडून दिला नाही, यामध्ये आरोग्य विभागासह प्रशासनाचे अधिकारीही सामिल असून त्यांची मोठी साखळी असल्याचा आरोप ही वैशाली नागवडे यांनी केला होता.
यामुळे या प्रकाराची नि:पक्षपणे व आर्थिक तडजोड न करता सखोल चौकशी होणार का असा प्रश्न आहे. जर चौकशी झाली तर दोषी असलेल्या संबंधित रूग्णालय व संबंधित अधिकारी यांच्यावर काय कारवाई होईल याकडे तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.










