इंदापूर : महान्यूज लाईव्ह
अजित पवार यांचा दोन दिवसांपूर्वी फोन आला, परंतु देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल्यानंतर निर्णय घेऊ असे सांगितले आहे. आम्ही युतीचा धर्म पाळतो, पण महायुतीमधील घटक पक्षांनी देखील महायुतीचा धर्म पाळावा असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
आज इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परीषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचा संकल्प केला असून उद्या तीन वाजता इंदापूर येथे मेळावा होणार आहे, या मेळाव्यात फडणवीस हे भाजप कार्यकर्त्यांची समजूत घालतील व समाधान करतील असा विश्वास आहे. उद्या फक्त भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.
महाराष्ट्रात महायुती 45 पेक्षा जास्त जागा जिंकेल असे सांगून ते म्हणाले, बारामतीची जागा भाजपाला मिळावी यासाठी आमचे प्रयत्न होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत आली आणि केंद्रीय नेतृत्वाने जागा राष्ट्रवादीला सोडली. खरेतर
बारामतीत लोकसभा उमेदवार घोषणा होण्याआधी अजित पवारांनी एकत्र बसून चर्चा करायची होती, अर्थात महायुतीच्या बैठकीत आम्ही भूमिका मांडली.
आम्हाला कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्या. चार वेळा आम्ही आणि कार्यकर्त्यानी आजपर्यंत ऐकले, मात्र प्रत्यक्षात सातत्याने अडचणी आणण्याचे काम झाले हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेत कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे स्वतः फडणवीस येथे येऊन कार्यकर्त्यांशी बोलतील. देवेंद्र फडणवीस यांनी मागील सर्व घटनेची जबाबदारी घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी सागर बंगला येथे चर्चा केली. आता देवेंद्र फडणवीस उद्या इंदापूर येथे भूमिका मांडतील.











