छत्रपती संभाजीनगर : महान्यूज लाईव्ह
रात्रीच्या वेळी घरी आल्यानंतर एकाने इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावली. पहाटे तीनच्या वेळेस मोठा स्फोट झाला. धुराच्या लोटात टेलरच्या दुकानाला आग लागली. कोणालाच काही कळलं नाही आणि गुदमरून दोन चिमुकल्यांसह सात जणांचा जीव गेला.
छत्रपती संभाजीनगर मधील छावणी परिसरात ही घटना रात्रीच्या वेळी घडली आज पहाटेच्या वेळी घडली. कपड्यांना आणि सोफासेटला आग लागून धूर निर्माण झाला आणि तो वरच्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने या धुरात गुदमरून सात जणांचा जीव गेल्याची ही घटना घडली आहे.
दोन चिमुकल्यांसह संपूर्ण कटुंब उध्वस्त झाल्याने परिसरातहळहळ व्यक्त केली जात आहे. वसीम शेख, तनवीर वसीम शेख यांच्यासह त्यांचा तीन वर्षाचा मुलगा असीम व दोन वर्षाची मुलगी परी हिचा यामध्ये मृत्यू झाला तर हमीदा बेगम (50 वर्ष), सोहेल शेख (35 वर्ष) व रेश्मा शेख (22 वर्ष) यांचा या घटनेत दुर्दैवी अंत झाला.
पहाटे तीन च्या वेळेस लागलेल्या आगीत टेलरच्या दुकानातील कपडे आणि सोफासेट पूर्ण जळाला. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर तयार झाला आणि तो धूर दुसऱ्या मजल्यावरच्या शेख कुटुंबाच्या घरात पसरला ज्यातून कोणालाच बाहेर पडता आलं नाही आणि गुदमरून सर्वच्या सर्व सात जण मृत्युमुखी पावले.











