हिंगोली : महान्यूज लाईव्ह
घटना हिंगोली शहरातील आहे. फक्त चिकन घेण्यावरून मच्छी मार्केटच्या परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रुपांतर चक्क दोन गटातील दंगलीत झाले. प्रचंड दगडफेकीमुळे या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
हिंगोली शहरातील मच्छी मार्केट परिसरात रात्री दहाच्या सुमारास चिकन खरेदी करण्यासाठी आलेल्या व विक्री करणाऱ्यांमध्ये वाद झाला आणि हा वाद विकोपाला जाऊन भांडण लागले. थोड्याच वेळात दोन गट परस्परांना भिडले आणि प्रचंड दगडफेक झाली.
या नंतर हिंगोली पोलिसांचा फौजफाटा या घटनास्थळी पोचला. मात्र दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. रस्त्यावर दगडांचा खच पडला होता. पोलिसांनी दोन्ही गटाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशीरा दोन्ही गटांनी परस्परांविरोधात तक्रारी दिल्या, त्यावरून आठ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.











