• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीत शाळा, महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या टुकार व रोडरोमियोंना दणका

tdadmin by tdadmin
March 30, 2024
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामतीत शाळा, महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या टुकार व रोडरोमियोंना दणका

बारामती वाहतूक पोलीस आणि निर्भया पथकाची कारवाई!

बारामती : महान्यूज लाईव्ह 

बारामती शहरातील विविध शाळा, महाविद्यालय तसेच कोचिंग क्लासेस परिसरात विनाकारण मोटार सायकलवर फिरून तसेच अनेक जणांचा ग्रुप करत संबंधित ठिकाणी बसून विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या टुकारांना आणि रोडरोमिओंना बारामती वाहतूक शाखा व निर्भया पथकाने चांगलाच धडा शिकवला.

सतत त्रास देणाऱ्या टुकार आणि रोड रोमिओंवर कारवाई करण्याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी बारामती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निर्भया पथकाचे कामकाज पाहण्याबाबत आदेश दिले. 

निर्भया पथकातील पोलीस अंमलदार आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने पोलीस निरीक्षक यादव यांनी बारामती शहरातील एम. ई. एस. हायस्कुल, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय परिसर, सातव चौक, फलटण चौकात मोहीम राबवून टुकार मुले, मोटारसायकलचा कर्कश आवाज करत महिलांना विद्यार्थिनींना त्रास देऊन सर्वांचे लक्ष विचलित करत फिरणारे, मोठमोठ्याने हॉर्न वाजवणारे, शाळा आवारात ट्रिपल सीट फिरून मजनूगिरी करून मुलींना त्रास देणारे टवाळखोर, बुलेट गाडीचा सायलेन्सर बदलून मोठा आवाज करणारे ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. 

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी महिला मुलींच्या संरक्षणासाठी व त्यांना निर्भय बनवण्यासाठी शाळा महाविद्यालयात भेटी देत मार्गदर्शन करत जनजागृतीचे मोठे काम केले आहे. बारामती शहरातील तक्रारी पाहता लागलीच त्यांनी यावर काम सुरु केले असून कारवायाचे सत्र सुरु केले आहे. त्यामुळे महिला मुलींनी आणि पालकांनी समाधान व्यक्त करत वाहतूक शाखेचे आणि निर्भया पथकाचे आभार मानले आहेत. ही कारवाई बुधवारी आणि आज शनिवार दिनांक 29 मार्च असे 2 दिवस करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरू राहील.

या कारवाईत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, पोलीस अंमलदार वनिता कदम, सुनील धगाटे, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सुधाकर जाधव, प्रदीप काळे, प्रकाश चव्हाण, सिमा साबळे, सविता धुमाळ, अजिंक्य कदम, रेश्मा काळे, माया निगडे, सुभाष काळे, योगेश कांबळे, स्वाती काजळे, रुपाली जमदाडे, अशोक झगडे यांनी सहभाग घेतला. 

फक्त तक्रार द्या, तक्रारदाराचे नाव गोपनीय राहील!

 चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक : महिला व मुलींना कोणत्याही पुरुषांकडून काही त्रास होत असेल तर तात्काळ निर्भया पथकाकडे ९२०९३९४९१७ तर, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या ७७७७९२४६०३ या क्रमांकावर संपर्क साधा. संशयित व्यक्तीची माहिती असेल तर नाव, त्याचे वर्णन, त्याचा वाहन क्र.आणि कोणत्या परिसरात राहतो, याबाबत माहिती मॅसेज करा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. स्थानिक पोलीस स्टेशन आणि निर्भया पथकाचे मदतीने कारवाई केली जाईल.

नागरिकांनी पुढे येऊन फायदा घ्यावा!

संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग : निर्भया पथकाचे काम आणखी प्रभाविपणे करण्यासाठी समन्वयक म्हणुन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सूचित  केले आहे. महिला-मुलींच्या संरक्षणासाठी योग्य मार्गदर्शन करून त्याबाबत अंमलबजावणी होईल. नागरिकांनी पुढे येऊन फायदा घ्यावा.

 सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी :   नागरिकांनी आपल्या काहीही तक्रारी असतील तर त्या भागातील संबंधित पोलीस ठाणे आणि निर्भया पथकाला कळवाव्यात. नागरिकांनी केलेल्या कोणत्याही तक्रारींचे पारदर्शकपणे निरसन केले जाईल.

Next Post
पाटबंधारे विभागाने गार – बेटवाडीला पाणी सोडलं खरं; पण ते महिलांच्या हंड्यापर्यंत पोचलेच नाही!

पाटबंधारे विभागाने गार - बेटवाडीला पाणी सोडलं खरं; पण ते महिलांच्या हंड्यापर्यंत पोचलेच नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group