विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील गोजवावी नजर च्या सावंतवाडीत गेल्या काही वर्षांपासून शेतकरी एकत्र आले आहेत देशी वाणांचा संवर्धन करण करत आपली शेती नैसर्गिक रित्या समृद्ध करण्याचा वसाहत या शेतकऱ्यांनी घेतला आहे आणि हाच वसा कायम ठेवत येथील महिलांनी देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशी जातीची भाजीपाला वेलवर्गीय पिके यांच्या बियाण्याचे संवर्धन केले आहे या बीज बँकेची राहुरी कृषी विद्यापीठाला देखील भुरळ पडली आहे.
सावंतवाडी (गोजूबावी) ता. बारामती येथे सामिंद्राताई सावंत यांनी पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर सर यांच्या मार्गदर्शनाने नैसर्गीक शेती तंत्राच्या माध्यमातून साकारलेल्या देशी, गावरान बियाणे बीज बँकेमध्ये 150 पेक्षा जास्त गावरानी भाजीपाला बियांचे जतन व संगोपन केलेले आहे.
त्यांनी देशी बियांच्या वाढीसाठी महीला बचत गट, शेतकरी बचत गट व कृषी प्रदर्शनाच्या माध्यमात्तून प्रचार प्रसाराचेही काम केले. त्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेवून राहूरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मॉडेल जिनोम क्लब या योजनेच्या माध्यमातून कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ विजू अमोलिक व अमोल संसारे यांनी या बीज बँकेच्या उपक्रमाला भेट दिली व संपूर्ण सावंत कुटुंबाचा सत्कार केला.











