बारामती : महान्यूज लाईव्ह
फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय टेक्नो स्पिरीट 2024 या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील बीबीए -सी.ए. विभागातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये आपले ज्ञान व कौशल्य पणाला लावून चमकदार कामगिरी केली. सदर स्पर्धेमध्ये पेपर प्रेझेंटेशन , पोस्टर प्रेसेंटेशन, प्रश्नमंजुषा इ. स्पर्धासह एकूण चार स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
पोस्टर प्रेसेंटेशन मध्ये टी वाय बी बी ए- सीए या वर्गातील नेहा शिंदे आणि साक्षी सस्ते यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पेपर प्रेझेंटेशन मध्ये बीबीए सीए च्या तृतीय वर्षाच्या सोनाली शेरे आणि कोयल थोरात यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच पुणे येथील सरहद कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कात्रज पुणे यांनी आयोजित केलेल्या सरहद टेक्नोफिस्ट 24 आंतरमहाविद्यालयान स्पर्धेमध्ये नेहा शिंदे हिने दुसरा क्रमांक मिळवला.
कार्यक्रमाच्या आयोजकांनी संघाचे आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले. विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करून महाविद्यालयाचा व संस्थेचा गौरवात भर घातली.
या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशीद, विभाग प्रमुख महेश पवार व विभागातील विशाल शिंदे, अनिल काळोखे, पुनम गुंजवटे, अक्षय भोसले, सलमा शेख, वैशाली पेंढारकर, अक्षय शिंदे, कांचन खिरे या प्राध्यापकांनी अभिनंदन केले.
विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्री किरण गुजर, श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.











