महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
मराठा आरक्षण सरकारने केले तर ठीक, अन्यथा राजकारणाला रामराम करणार आणि राजीनामा देऊन टाकणार असे उदयनराजे म्हणाले. सर्वांना न्याय मिळत असताना मराठा समाजाने वंचित का रहिवे?अशी विचारणीही त्यांनी यावेळी केली.
“मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याची वेळ आली तर कोणत्याही परिस्थितीत मी राजीनामा देणारच. मग फक्त मराठा नाही तर ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्या सर्वांसाठी मी राजीनामा देणार. जर काही होत नसेल पदावर राहून काय उपयोग? असे उदयनराजे भोसले म्हणाले.










