बीड : महान्यूज लाईव्ह
मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकारची उदासीनता लक्षात घेत संतप्त मराठा समाजाने आता निवडणुकीत नेत्यांना हिसका दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. याचा भाग म्हणून बीड जिल्ह्यात व परभणी जिल्ह्यात मराठा समाजाने बैठक घेऊन यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा त्यांच्या मतदारसंघात प्रत्येकी 1000 उमेदवार उभे करण्याची आखणी केली आहे.
नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी यांच्या मतदारसंघात बीड व परभणी जिल्ह्यातील 1000 मराठा उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर बारामतीतही बारामतीतील मराठा समाजाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. मराठा समाजाची बीड शहरात व परभणी शहरातील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात बैठक झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला
दरम्यान सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक शहरांमध्ये मराठा समाजाची बैठक घेत आहेत, तर दुसरीकडे निवडणुकी संदर्भातही काही आखणी केली जात आहे. येत्या काळामध्ये राजकारण्यांना गावबंदी पाठोपाठ आता घरबंदी करण्याचाही ठराव काही शहरांमध्ये मराठा समाजाच्या वतीने मंजूर करण्यात आला आहे.











