• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हर्षवर्धन पाटलांचा लेटरबॉम्ब! बारामती लोकसभा निवडणुकीत मिठाचा खडा पडणार?

tdadmin by tdadmin
March 4, 2024
in यशोगाथा, सामाजिक, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
इंदापूर तालुक्यात आगामी लोकसभा – विधानसभेसाठी भाजपाची तयारी! रणनीती आखली.! 

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

इंदापूर तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी मध्ये मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता हर्षवर्धन पाटलांच्या एका लेटरबॉम्ब मुळे महायुतीच्या युतीधर्मामध्ये मिठाचा खडा पडण्याची चिन्हे आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इंदापूर तालुक्यात मित्र पक्षाचे पदाधिकारी शिवराळ भाषेत, बेताल वक्तव्य करत आहेत तसेच धमकी देत आहेत अशी भीती व्यक्त केली आहे.

दरम्यान हे पत्र दोन मार्च 2024 रोजी त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लिहिले आहे, परंतु काल म्हणजे रविवारी हर्षवर्धन पाटील यांची एका विवाह समारंभ मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी भेट झाली. यानंतर आज त्यांनी हे पत्र प्रसिद्धीस दिले आहे. यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वरील भीती व्यक्त केली आहे.

 या पत्रामध्ये हर्षवर्धन पाटील म्हणतात, राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कामकाज करत आहे, परंतु माझ्या तालुक्यांमध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षाचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मिळावे व सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर एकेरी व शिवीगाळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत.

 त्याचबरोबर तालुक्यांमध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत, त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे, तरी आपण याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य ती कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे ही विनंती, अशा स्वरूपाचे पत्र हर्षवर्धन पाटील यांनी लिहिले आहे.

 दरम्यान इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षामधून विस्तवही जात नाही. मात्र येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा धर्म म्हणून दोघांना एकत्र यावे लागणार आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांनी मात्र अशा एकीकरणाला विरोध केला असतानाच आता हर्षवर्धन पाटील यांच्या लेटरबॉम्ब ने या महायुती धर्मावर मिठाचा खडा पडणार का? अशा स्वरूपाचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 दुसरीकडे अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी इंदापूर येथे झालेल्या मेळाव्यामध्ये मित्र पक्षाला सामावून घ्या, तसेच त्यांच्यावर कोणतीही बेताल वक्तव्य करू नका, सांभाळून घ्या अशा स्वरूपाचे वक्तव्य केले होते, मात्र त्यानंतरही फरक पडला नसल्याचे चित्र यामध्ये दिसत असून हर्षवर्धन पाटील यांचा लेटरबॉम्ब हा महायुतीच्या इंदापुरातील एकीकरणाला बांध घालेल काय? अशा स्वरूपाचा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

Next Post
कोचिंग क्लासेस कायद्याविरोधात बारामतीत क्लासेसचालकांचे तहसीलदारांना निवेदन!

कोचिंग क्लासेस कायद्याविरोधात बारामतीत क्लासेसचालकांचे तहसीलदारांना निवेदन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group