परिसरात प्रचंड घबराट, विठ्ठल-रूख्मिणी मंदिरातील फराळ खाल्ल्याने झाली विषबाधा!
संदिप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल – रूख्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील अंदाजे २०० महिला व पुरूषांना विषबाधा झाली असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
या ग्रामस्थांना पोलिस व इतर ग्रामस्थांनी बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता, येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर आहेत. त्यामुळे पोलिस व महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले असून, रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
परिसरात या घटनेने घबराट पसरली असून, आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे. सध्या बाधित भाविकांवर उपचार सुरु आहेत. नेमका प्रकार कशामुळे झाला याचा शोध पोलीसही घेत आहेत.











