विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबामध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार बारामती दौऱ्यावर होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये पहाटेपासूनच विविध विकास कामाची पाहणी केली. त्यानंतर जनता दरबार झाल्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत बूथ कमिटी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला बारामती तालुक्यातील नागरिक, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी आमचं ठरलंय, वातावरण फिरलंय, बारामतीमध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये कसं? आता दादा म्हणतील तसं! हे बॅनर लक्ष वेधून घेत होते.
बारामतीतील पाटस रस्त्यावरील वृंदावन गार्डन या ठिकाणी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यासाठी बारामती शहर आणि तालुक्यातून प्रचंड संख्येने कार्यकर्ते, महिला व जेष्ठ नागरिक आले होते आणि या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता











