विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : पवार कुटुंबामध्ये राजकीय फूट पडल्यानंतर व निवडणूक आयोगाने, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच असल्याचे शिक्कामोर्तब केल्यानंतर आज रोहित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी बोलताना रोहित पवार यांनी जी बारामतीमध्ये लढत कधीच शक्य झाली नाही. ती अजितदांदाच्या माध्यमातून घडवण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. अशी टीका रोहित पवार यांनी भाजपवर केली.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले,गेले अनेक वर्ष बारामती मध्ये भाजप हे यशस्वी होत नव्हते. तसेच त्यांना पवार विरुद्ध पवार अशी लढत करायची होती. मात्र ते यात यशस्वी होत नव्हते आणि आता पक्ष आणि कुटुंब फोडून त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला भविष्यात नागरिकच उत्तर देतील असेही रोहित पवार म्हणाले.
बारामतीमध्ये अजितदादा बोलले ते बारामतीच नव्हे महाराष्ट्रातही कोणाला पटलेले नाही. खरे तर ते ज्या पद्धतीने बोलत होते, यावरून असे लक्षात आले की बारामती मध्ये पवार विरुद्ध पवार ही लढत होईल. खरे तर भाजपने अनेक वर्ष पवारांना फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते कधीही यशस्वी झाले नाहीत. आता मात्र अजितदादांच्या माध्यमातून त्यांनी पक्ष आणि कुटुंब फोडल्यानंतर आता बारामती मध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातसाठी उमेदवाराची जेव्हा अधिकृतपणे याची घोषणा केली जाईल त्यानंतरच आपल्याला बोलता येईल. उमेदवारी दिल्यानंतर त्याचं काय करायचं ते लोक ठरवतील आणि पवारसाहेब ठरवतील. असे रोहित पवार बारामतीमध्ये बोलताना म्हणाले.











