• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बरं का खंडेराव.. अहो कर्जत, नगर, सिन्नर नंतर आता चंद्रशेखर यादव दौंडला आलेत बरं का? सगळेच पोलीस काय फक्त हाणामारीची मज्जा बघत नाहीत; लोकांच्या दररोजच्या गरजा, निकड आणि अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा पोलीस काम करतात बरं!

tdadmin by tdadmin
February 5, 2024
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बरं का खंडेराव..  अहो कर्जत, नगर, सिन्नर नंतर आता चंद्रशेखर यादव दौंडला आलेत बरं का? सगळेच पोलीस काय फक्त हाणामारीची मज्जा बघत नाहीत; लोकांच्या दररोजच्या गरजा, निकड आणि अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा पोलीस काम करतात बरं!

अखेर दौंड शहरातील मुख्य रस्त्यांनी आणि चौकांनी घेतला मोकळा श्वास! कार्यभार स्वीकारतच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची अतिक्रमणावार हातोडा!


राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह

दौंड : ऐका ना खंडेराव…! खंडेराव त्याचं काय असतं माहित्येय का? एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचं त्याच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही चांगली काम केली की, कौतुक होतं, पण अशावेळी लगेच त्याला शत्रूही तयार होतात. कारणही तसंच असतं.. संबंधित अधिकारी झाकी मारायला आणि आल्या आल्या लोकांमध्ये आपली इमेज तयार करायसाठी अशा प्रकारची नौटंकी करतो.. अन् असं दाखवतो की, आपण मोठे समाज भक्त आहोत. मग त्याच्या पेपरामध्ये बातम्या झळकल्या की, संबंधित पोलीस अधिकारी हा एक तर सिंघम आहे किंवा काही दिवसानंतर त्याच्या हद्दीत हप्ते वाढले की मग तो मीडिया ओरिएंटेड असल्याचं समजलं जातं.

किंबहुना त्याला फार माध्यमाची हौस आहे, त्यामुळे तो आपल्या सकारात्मक बातम्या पेरतो. अशा प्रकारची चर्चा त्यांचेच इतर सहकारी तयार करतात. पण सगळीकडेच असं नसतं.. आणि खंडेराव सगळेच अधिकारी अशा फक्त झगमगटाला आणि पैशाला हपापलेले नसतात बरं का.. काहीजण खरोखरच लोकांची सेवा करण्याचे ब्रीद घेऊन वावरत असतात, कळलं का?

म्हणजे खंडेराव, त्याचं काय झालं; दौंड शहरातील गर्दीने गजबजलेल्या रस्ते आणि चौकाचौकात कित्येक वर्षांपासून अस्ताव्यस्त अवस्थेत असलेल्या अतिक्रमणावर अचानक हातोडा पडला. मग सगळीकडे चर्चा सुरू झाली.. नवा साहेब रुजू झालाय, नव्याचे नऊ दिवस वगैरे..! पण या पोलीस अधिकाऱ्याला जे जे ओळखतात, त्यांना पक्क माहिती की, हा पोलीस अधिकारी प्रत्येक काम समाजाभिमुख करतो. सिंघम – बिंघम असं काही आम्ही म्हणणार नाही.. बरं का? हा साहेब साधासुधा आहे.. सगळ्या लोकांत मिसळतो.. नाव मात्र दमदार आहे… नाव आहे पोलीस इन्स्पेक्टर चंद्रशेखर यादव!

खंडेराव.. कालची गोष्ट तुम्हाला सांगतो, दौंड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच चंद्रशेखर यादव यांनी करवाईला सुरवात केली. दौंड पोलीस ठाण्याचा चार्ज घेतला आणि इथे सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट कोणती आहे? तर ती वर्दळीची आणि वाहतुकीची! अतिक्रमणामुळे आणि अरुंद रस्त्यामुळे वाहतूक बोजड बनते. गर्दी वाढते. दुकानदारांवरही त्यांच्या ताण येतो आणि गर्दीवरही!

मग जिथे जातील तिथे पहिला अतिक्रमणावर पहिली नजर टाकत, लोकांना विचारात घेऊन, विश्वासात घेऊन आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करत योग्य तो समन्वय साधण्याची भूमिका ठेवणाऱ्या चंद्रशेखर यादव यांनी दौंड मध्येही ते पाऊल उचलले नसते तरच नवल! त्यामुळे त्यांनी शहरात येताच वाहतूकीला आणि ये- जा करण्यास अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणे काढल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले.

खंडेराव.. मी काय म्हणतो..या चंद्रशेखर यादवांची कारकीर्द इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये असेल, वालचंदनगर येथे असेल, बारामतीच्या गुन्हेशोध पथकामध्ये असेल, नगर जिल्ह्याच्या कर्जत तालुका आणि कोतवाली शहर पोलीस ठाण्यामध्ये असेल आणि अगदी सिन्नरच्या पोलीस ठाण्यात अल्पकालावधीतील सेवा असेल, चंद्रशेखर यादव जिथे जातील, तिथे पहिल्यांदा लोकांचा मार्ग मोकळा करतात.. मग तो रस्ता असेल किंवा खाजगी सावकारी! किंवा गावात दारू पिऊन धिंगाणा घालणारे टुकार असतील किंवा लोकांना त्रास देणारी सडकसख्याहारांची टोळी! एरवी दिसायला नरम असणारा माणूस.. कायद्याच्या राज्यात तेवढाच कठोर आहे, हे फक्त पोलीस ठाण्यात पायरी चढणाऱ्या गुन्हेगारालाच कळते.. इतरांना नाही… कळलं का?

दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्विकारला आणि त्यांनी त्यांच्या स्टाईलने पोलीसगिरीला सुरवात केली. शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि चौका चौकात ठिकठिकाणी बेकायदा अतिक्रमणे केली होती. ही अतिक्रमणे काढण्यासाठी दौंड नगरपालिका प्रशासन पुढे येत नसल्याने नागरिकांना येजा करण्यास मोठा अडथळा ठरत होता.

शहरातील संविधान चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरील रस्त्यालगत तसेच फुटपाथवर असणाऱ्या छोट-मोठ्या विक्रेत्यांनी वर्षानुवर्षे अतिक्रमण करून शहराचा श्वास कोंडला होता. त्यामुळे वारंवार मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होऊन याचा सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. गेली अनेक वर्षांपासून बेशिस्त वाहतुक, अवैध प्रकारे करण्यात आलेली अतिक्रमणे यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण तर होतोच , शिवाय याचा फटका सर्वानाच बसतो.

मात्र पोलीस निरीक्षक यादव यांनी हा उपक्रम हाती घेत स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमणांवर हातोडा घातला.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहायक फौजदार सुरेश चौंधरी, सहायक फौजदार बबन जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, पोलीस शिपाई रवी काळे, योगेश पाटील, योगेश गोलांडे तसेच दौंड नगरपालिकेचे प्रकाश चलवादी, किशोर लांडगे, रणजीत भोसले, कैलास चलवादी, पंकज काळे आदींनी रस्त्यावरील अतिक्रमणे काढून कारवाई केली.

Next Post

देशातील लोकसभा निवडणुकीचा सर्वप्रथम प्रचाराचा शुभारंभ इंदापुरातून..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group