शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर शहरात सराफी पेढीवर गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सिंहगड येथील जंगलातून ताब्यात घेतले आहे.
शरद बन्सी मल्लाव व बबलू दत्तात्रय सोनलकर असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे. यातील आरोपी बबलू हा जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शिरूर शहरात कुलथे सराफ ज्वेलर्स यांच्या दुकानावर रात्री साडे आठच्या सुमारास गोळीबार करण्यात आला होता. यावेळी या वेळी आरोपींकडून दुकानात काम करणारे भिका पंडित यांनी पिस्तुलाचा दस्त लागल्याने जखमी झाले होते. या गुन्हाचा शोध पोलिस करत होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करत असताना पथके रवाना केली होती. यावेळी माहिती घेत हा गुन्हा शरद मल्लाव व बबलू सोनलकर यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास घेत आरोपी शरद मल्लाव यास ताब्यात घेतले.
आरोपीकडून तीन पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर गुन्ह्यातील आरोपी बबलू सोनलकर हा जखमी झाला असल्याने त्यावर ससून रुग्णालयात उपचार घेत असून पोलिसांकडून अटक करण्यात येणार आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, प्रदीप चौधरी, अमित सिदपाटील, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजु मोमीन, सचिन घाडगे, अतुल डेरे, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, दीपक साबळे, अजित भुजबळ, अक्षय नवले, संदीप वारे, अक्षय सुपे, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात सचिन भोई यांनी केली आहे.











