बारामती – महान्यूज लाईव्ह
उद्या (ता.४) उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर असून सकाळी सहा वाजलेपासून ते बारामतीतील विविध विकासकामा्ंची पाहणी करणार आहेत. जनता दरबाराबरोबरच उद्या अजितदादा हे बारामतीतील सर्व स्तरातील लघु, मध्यम व बड्या व्यापाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत.
रविवारी सकाळी सहा वाजता विकासकामांच्या पाहणीला अजित पवार सुरवात करणार असून त्यानंतर सकाळी मळद येथील स्केटींग ट्रेकला ते भेट देणार आहेत. स्केटिंग ट्रेकचे उदघाटन झाल्यानंतर देसाई इस्टेट येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनसंपर्क कक्षाचे उदघाटन करणार असून तेथे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संघटना व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.
यानंतर सकाळी साडेदहा वाजता विद्या प्रतिष्ठानच्या माहिती व तंत्रज्ञान सभागृहात ते कार्यकर्त्यांशी व नागरिकांशी भेटून निवेदने स्विकारतील. दुपारी साडेबारा वाजता भिगवण रस्त्यावरील चिराग गार्डन येथे बारामती व्यापारी महासंघाने आयोजित केलेल्या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. संध्याकाळी काऱ्हाटीच्या कृषी मूल शिक्षण संस्थेच्या वार्षिक सभेस ते उपस्थित राहणार आहेत.











