दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या भीमा साखर कामगार संघाच्या नुकत्याच पार पडल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री नागेश्वर कामगार परिवर्तन पॅनलने २२ पैकी २१ जागांवर दणदणीत विजय मिळवत कामगार प्रगती पॅनलच्या उमेदवारांना धुळ चारत पराभव केला.
मागील दहा वर्षापासून भीमा कामगार संघावर वर्चस्व असलेल्या सत्ताधाऱ्यांना कामगारांनी पराभूत केले. संघाचे अध्यक्ष अर्जुन दिवेकर यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. भीमा साखर कामगार संघाची पंचवार्षिक निवडणुक मंगळवारी (दि ३०) पार पडली. या निवडणुकीत श्री नागेश्वर कामगार परिवर्तन पॅनल विरुद्ध कामगार प्रगती पॅनलने उमेदवार उभे केले होते.
या निवडणुकीत सत्ताधारी मंडळींना धुळ चारत श्री नागेश्वर कामगार परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवला. नवनिर्वाचित विजयी उमेदवार पुढील प्रमाणे प्रवीण रामचंद्र शितोळे (अध्यक्ष), केशव वसंत दिवेकर (उपाध्यक्ष), रघुनाथ रंगनाथ शेळके (जनरल सेक्रेटरी), गोरख जगन्नाथ फुलारी (सेक्रेटरी), दीपक नानासो पाटणकर (खजिनदार), गिरीश प्रतापराव कदम व भाऊ लालासो शितोळे (पदाधिकारी ऑफिस बेअरर्स), चंद्रकांत तुकाराम हंडाळ, दादा भागुजी ठवरे, नानासाहेब मारुती भागवत, प्रदीप आनंदराव शितोळे, प्रकाश साहेबराव गुंड, बाळासाहेब बबन माकर, मच्छिंद्र निवृत्ती शितोळे, महादेव भाऊसो टेंगले, मारुती बाबासाहेब गोरे, रवींद्र शशिकांत चव्हाण, राजेंद्र मारुती शितोळे, वसंत पोपट थोरात, सुभाष जिजाबा मोरे, सुरेश बबन वाघोले, हेमंत व्यंकटेश पाटणकर यांची सदस्यपदाचे उमेदवार बहुमतांनी विजयी झाले.
दरम्यान अर्जुन दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली कामगार प्रगती पॅनलचे एकमेव व महत्त्वाचे पद मानले जाणारे जनरल सेक्रेटरी या पदासाठी एकमेव उमेदवार रघुनाथ रघुनाथ शेळके हे विजयी झाले. कामगार नेते संजय शितोळे, प्रविण शितोळे, केशव दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली श्री. नागेश्वर कामगार परिवर्तन पॅनलने २१ जागांवर दणदणीत विजय मिळवत बहुमत मिळवत परिवर्तन घडवले.
भीमा साखर कामगार संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी (सन २०२४ ते २०२९ ) २२ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात उभे होते. एकूण ४६४ मतदारांपैकी ४६१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक शितोळे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विठ्ठल काकडे यांनी कामकाज पाहिले.











