शिरुर : महान्यूज लाईव्ह
शिरूर शहरातील मध्यवस्तीत सुभाष चौक येथे मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी सराफ पेढीवर गोळीबार करत चोरीचा प्रयत्न केल्याने शिरूर शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,शिरूर शहरातील सुभाष चौकात अशोक जगन्नाथ कुलथे सराफ या नावाचे माजी नगराध्यक्ष अशोक कुलथे यांचे दुकान आहे. त्या दुकानात भिकाजी पंडित हे कामाला आहेत. संध्याकाळी साडे आठच्या सुमारास मोटारसायकलवरुन आलेले व मास्क घातलेले दोन जण दुकानात शिरले
चोरीच्या उद्देशाने त्यांनी प्रयत्न करताच चोरट्यांशी प्रतिकार करणारे पंडित हे जखमी झाले. यावेळी चोरट्यानी गोळीबारही केला. गोळीबारानंतर सदर चोरटे मोटारसायकल वरुन पसार झाले. दरम्यान गोळीबाराच्या आवाजाने परिसरात घबराट उडाली. मोठ्या संख्येने नागरिकांनी कुलथे यांच्या दुकानासमोर धाव घेतली. दरम्यान रात्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस आरोपीच्या शोधार्थ तपास करत आहेत.











