मराठी चित्रपट अभिनेते किरण माने हे बंडखोर लेखक व साहित्य साहित्यिक म्हणून ओळखले जातात. अनेकदा विविध प्रकारच्या विधानांनी ते सतत चर्चेत असतात काल-परवा अभिनेता पुष्कर जोग याने जातगणनेचे सर्वेक्षण करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याबाबत वक्तव्य करताना आपण लाथच मारली असती असे वक्तव्य केले. त्यावरून अभिनेते किरण माने यांनी पुष्कर जोगला चांगलेच खडसावले आहे.
या संदर्भात किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून पुष्कर जोगला तुझ्या पार्श्वभागात दम असेल तर ज्या नेत्याने जातगणना करायला लावली त्याला लाथ मार असा सल्ला दिला आहे. पुष्कर जोग याने त्याच्या फेसबुक पेजवर अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियातून अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत त्या पार्श्वभूमीवर किरण माने यांनी देखील पुष्कर जोगला चांगलाच टोमणा मारला आहे.
किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर जे नमूद केले आहे ते पुढील प्रमाणे, आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. ‘आमचीच सत्ता’ हा पोकळ माज आलाय…” मी परवाच ‘अजब गजब’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो. दुसर्याच दिवशी पुष्कर जोग नांवाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्यानं विधान केलं, जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या.
अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते. त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे. तुला लाथाच घालायच्यात ना?? लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा??? …मी तुला चॅलेंज देतो- ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल. खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्याकडून चार लाथा खायच्या.
बोल. आहे दम तुझ्या पार्श्वभागात??? अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आडनांव घेऊन डिंग्या मारतोयस? काय घंटा इतिहास आहे तुमच्या आडनावाचा? असला तरी काय खुट्ट्याला बांधायचाय?? आपलं काम इमानेइतबारे करणार्या कर्मचार्यांवर कसला माज दाखवतो तू??? हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवुन तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा. बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा. मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल. मापात रहा.











