बारामती : महान्यूज लाईव्ह
महावितरण ने एकाच दिवसात पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकाच वेळी 869 ठिकाणी राबवलेल्या मोहिमेत अनधिकृतरित्या आकडे टाकून अथवा मीटरमध्ये फेरफार करून केलेल्या वीज चोरीची 1275 प्रकरणे पकडली. या सर्व ठिकाणी 1 कोटी 59 लाख रुपयांची अनधिकृत वीज वापर झाल्याचे महावितरणने उघडकीस आणले.
महावितरण चे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी या संदर्भात विविध कार्यालयांच्या बैठका घेतल्या होत्या. त्यांना दिलेल्या आदेशानुसार एकाच वेळी ही मोहीम दिवसभर राबवण्यात आली. यामध्ये पुणे जिल्ह्यात तब्बल एक कोटी एकवीस लाख 84 हजार रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली असून या ठिकाणी 653 ठिकाणी ही वीजचोरी झाल्याची आढळून आले.
सातारा जिल्ह्यातही 12 लाख 34 हजार रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली असून, या ठिकाणी 151 प्रकरणे उघडकीस आली. कोल्हापूर मध्ये 134 ठिकाणी सात लाख 3 हजार रुपयांपर्यंतची वीज चोरी, सांगली जिल्ह्यात 168 ठिकाणी नऊ लाख 61 हजार रुपयांची वीजचोरी तर सोलापूर जिल्ह्यात 170 ठिकाणी आठ लाख 29 हजार रुपयांची वीज चोरी महावितरणने आज पकडली.











