दौलतराव पिसाळ: महान्यूज लाईव्ह
वाई : भुईंज (ता.वाई) गावच्या हद्दीत धनगरवाडी रस्त्याकडेला एका शेतकर्याच्या बांधावर असणारी साग जातीची अनगड झाडे या शेतकऱ्यानं वनविभागाच्या कार्यालयाची परवानगी न घेताच तोडून वडूज (ता.खटाव जिल्हा सातारा) येथे विकली, मग वन खात्याने ही झाडे जप्त केली..
वाई तालुक्याच्या वनविभागाच्या प्रमुख स्नेहल मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई महिला वनरक्षक व्ही. एम. चौरे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन धनगरवाडी रस्त्यावर पकडली. एका आरोपीसह एक पिकअप व तब्बल ४ लाख १० हजार ६१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वाई तालुक्यातील या घटनेने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. स्नेहल मगर यांना ५ जानेवारी रोजी खास खबऱ्याने माहिती दिली की, भुईंज (ता.वाई) गावच्या हद्दीत धनगरवाडी रस्त्याकडेला एका शेतकऱ्याच्या बांधावर असणारी साग झाडे वडूजकडे नेली जात आहेत. त्यानंतर मगर यांनी सहकारी कर्मचारी पाठवून ही कारवाई केली.
वनरक्षक व्ही. एम. चौरे, वनपाल डि. एन. व्हनमाने, एस.आर.मोरे यांच्या मदतीने ५ जानेवारी पासून यासाठी सापळा लावला होता. भुईंज गावच्या हद्दीत असणाऱ्या धनगरवाडी गावाकडील रस्त्यावर पाळत ठेवून ७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजून ५० मिनिटे असताना धाडसी छापा टाकला व एका आरोपीसह (एम.एच.११ ए. जी. ३४१४ या क्रमांकाच्या) पिकअप जीप व त्यामध्ये सागाचे ३ हजार ६८६ घन मिटर लाकडांचे ओंडके सापडले.
या सर्वांची किंमत तब्बल ४ लाख १० हजार ६१७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जप्त करुन अतुल विजय राऊत यांच्यावर वन अधिनियम ४१ ( २ ) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











