संदीप मापारी पाटील, बुलढाणा
श्रीलंका ते अयोध्या जाणाऱ्या व श्रीराम मंदिरात स्थापित होणाऱ्या चरण पादुकांचे आगमन लोणार येथे आज रोजी झाले. 30 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेस रामराज्य युवा यात्रा असे नाव देण्यात आले आहे.
यात्रेचे राष्ट्रीय संयोजक आशुतोष असून यात्रेचे तामिळनाडू, कर्नाटक येथून महाराष्ट्रात आगमन झाले आहे. यात्रा 15 डिसेंबर रोजी श्रीलंकेतील अशोक वाटिका येथून प्रारंभ झाली. 20 जानेवारी पर्यंत तेलंगणा, छत्तीसगढ, ओडिशा, मध्यप्रदेश करीत शेवटी उत्तरप्रदेशात दाखल होणार आहे.
संपूर्ण यात्रेदरम्यान 108 शोभायात्रा, 151 ठिकाणी पादुका पूजन कार्यक्रम, मार्गातील 251 श्रीराम गमन स्थाने, तसेच 51 नागरिक स्वागत सभा होणार आहेत. 8 राज्य व 10 हजार किलोमीटर प्रवास करीत ही यात्रा अयोध्या धामला पोहोचणार आहे.











