घटना गुजरातच्या राजकोटमधील! एका महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद देताना आपल्या पतीनेच आपल्यावर बलात्कार केला आणि आपले नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढले आणि पोस्ट केले अशा प्रकारची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती.
त्या प्रकरणात पतीला अटक करण्यात आली, त्याने जामीनाचा मांडलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. आणि पुरुष मग तो कुणीही असो दुसरा किंवा पती; जर बलात्कार केला असेल, तर हा बलात्कारीच! त्यामध्ये त्या गुन्ह्यात माफी नाही अशा स्वरूपाचे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
राजकोट मधील न्यायालयाने या संदर्भात महिलेच्या याचिकेवर निर्णय दिला पतीने मांडलेला जामीन याचा अर्ज फेटाळताना उच्च न्यायालयाने जरी पतीने केला तरी तो बलात्कारही बलात्कारच असतो अशा स्वरूपाचे मत व्यक्त केले.
ती व्यक्ती त्या महिलेचा पती आहे म्हणून त्याला कुठलीही सवलत मिळू शकत नाही. पतीने जरी पत्नीवर बलात्कार केला, तरी तो बलात्कारातच गृहीत धरला जाणार. आठ डिसेंबर रोजी या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला आणि महिलेच्या पतीचा जामीन अर्ज फेटाळला.
महिलेच्या याचिकेवर निकाल देताना न्यायाधीशांनी अमेरिकेतील 50 राज्यांचा अहवाला दिला अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आदी वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानण्यात आला आहे इंग्लंडमधील जे कायदे आहेत त्यावर त्याचा प्रभाव भारतीय दंड संहितेवर मोठा आहे आणि महिलेवर झालेला कोणताही बलात्कार हा कलम 376 खाली शिक्षेस पात्र ठरतो.











