दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बेमुदत संप सुरू केला आहे.
या संपामुळे तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील यंत्रणा ठप्प झाली असून डोंगर, दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थी आबालवृद्धांसह शेतकऱ्यांची कामे अडकून पडणार आहेत. राज्य सरकारने या बेमुदत संपाचा विचार करुन लवकर मध्यस्थी करून जनतेला न्याय द्यावा अशी मागणी आता नागरिक करीत आहेत.
वाई तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन आपल्या मागण्यांचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पोहचविण्यासाठी
वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे दिले.











