दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : १३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वाई- धोम मार्गावर नाव्हेची वाडी वाई (ता.वाई) गावच्या हद्दीत रात्रगस्त करीत असताना वनविभागाने बेकायदेशीर सागाची वाहतूक करणाऱ्यांना पकडले त्यांच्याकडून सव्वातीन लाखांचा सागवान जप्त केला आहे.
योगेश मारुती सणस (वय 31) व मारुती आबुराव सणस (वय 58, दोघे रा.वेलंग,ता.वाई जि.सातारा) हे महिंद्रा कंपनीचा पिक अप टेंपो क्र.MH 02-XA-2608 मधून साग जातीचा लाकुडमाल विनापरवाना वाहतुक करीत होते. ते वाहतूक करत असताना आढळून आल्याने सदरचा टेम्पो लाकुड मालासह जप्त करून वनरक्षक वाई यांनी वनगुन्हा नोंद केला.
या कारवाईत एकुण ३ लाख २० हजार ३९३ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहायक वनसंरक्षक श्री महेश झांझुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल स्नेहल मगर, वनपाल एस.आर.मोरे, वनरक्षक एस.एस.चौगुले, वनरक्षक आर. व्ही. भोपळे यांनी केली











