पुणे : महान्यूज लाईव्ह
पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीतील 35 प्रशिक्षणार्थी कोकणात पर्यटनासाठी गेले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्राच्या बीचवर त्यातील पाच जण पाण्यात बुडाले, चार मुलींचा मृतदेह हाती लागला असून, एक विद्यार्थी अद्यापही बेपत्ता आहे.
सातत्याने दरवर्षी समुद्रामध्ये फिरण्यासाठी गेलेले विद्यार्थी बुडण्याच्या घटना आपण ऐकतो आणि तरीही पुन्हा पुन्हा विषाची परीक्षा घेतली जाते. यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. अनेक बीच हे पर्यटकांनी गर्दीने भरलेले असतात, मात्र खोल समुद्रात जाण्याची हौस कधीकधी जीवावर बेतते हे माहीत असूनही सतत विषाची परीक्षा अनेक शिक्षण संस्था का घेतात? याचे मात्र पुढे अद्याप उलगडलेले नाही.
कुटुंबासोबत मुलं मर्यादित प्रमाणात दंगामस्ती करतात, मात्र मित्र-मैत्रिणींबरोबर या मर्यादेला सीमाच उरत नाही आणि त्यातून अशा घटना घडतात. कधीकधी अतिआत्मविश्वासातून देखील मुलं जायला नको तिथे जातात आणि बऱ्याचदा खोल जागेचा किंवा इतर ठिकाणचा अंदाज न आल्याने त्यांच्या जीवावर बेतते.
पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीच्या 35 विद्यार्थ्यांची सहल कोकणात गेली होती हे सर्व विद्यार्थी आंघोळीसाठी देवगड येथे पोहोचले काल दुपारी चार वाजण्याची सुमारास त्यातील पाच जण बुडाल्याची काय टाच सगळीकडे आरडाओरडा झाला या घटनेमध्ये शोध कार्यात चार मुलींचा मृतदेह हाती लागला यामध्ये पायल बनसोडे, अंकिता गालटे, अनिषा पडवळ व प्रेरणा डोंगरे या चार मुलींचा मृतदेह हाती लागला, तर बेपत्ता झालेल्या राम डिचोलकर या मुलाचा मात्र काल रात्री उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता.











