मुंबई : महान्यूज लाईव्ह
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 13 डिसेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता असून, 13 डिसेंबर पर्यंत हा पाऊस राहील. उत्तर भारतात सतत होत असलेल्या पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे अनेक भागात धुक्याची दाट चादर पाहायला मिळेल.
सध्या पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला असला, तरी अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडत आहे. येत्या 24 तासातही राज्यात अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये वर्धा, नागपूर, हिंगोली, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे येत्या पाच ते सहा दिवसात मुंबई आणि पुण्यातील तापमान हे कमल तापमान हे सामान्य तापमानापेक्षा कमी राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुसरीकडे 13 डिसेंबर पर्यंत राज्यात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात जिथे पाऊस पडणार नाही, अशा ठिकाणी गारठा कमालीचा वाढेल. असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.











